-अक्षय आगलावे
मल्टि डिसिप्लिन इव्हेंट्स म्हटलं की भारत इतकी वर्षे नेमबाजी आणि कुस्तींच्याच पादकांवरती अवलंबून राहायचा. पण यांच्या सोबतीला आता नवीन एक खेळ आला आहे. गेल्या दशकात भारतीय बॅडमिंटनने खूप मोठी झेप घेतली आहे. आता बॅडमिंटनमध्ये भारताची गणना विश्व स्थरावर चीन, कोरिया, जपान यांच्यासारख्या देशांबरोबर होऊ लागली आहे. याचे कारण म्हणजे सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, किदांबी श्रीकांत यांचे विश्वस्थरावरील यश.
त्यावेळेसच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताने आत्तापर्यंत सर्वात मजबूत टीम फिल्ड केली आहे. त्यामुळे भारतीयांच्या बॅडमिंटनपटूनकडून खूप मोठ्या पदकांची अपेक्षा आहेत.
भारतीय संघात ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पीव्ही सिंधू, सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत, एचएस प्रणॉय, ऋत्विका शिवानी गद्दे, अश्विनी पोनप्पा, सिक्की रेड्डी, सात्विक साईराज, चिराग शेट्टी यांचा समावेश आहे. महिला एकेरीत सिंधू अग्रमानांकित तर सायना ही द्वितीय मानांकित आहे.
त्यामुळे सर्व भारतीयांनी अंतिम सामन्याची अपेक्षा ठेवणे काही वावगं ठरणार नाही. सिंधू आणि सायनाच्या अंतिम फेरीसाठी जर कोणी अडथळा ठरू शकत असेल तर ते म्हणजे ख्रिस्ती गिल्मर आणि मिचेल ली. ड्रॉ बघता किदांबी श्रीकांत उपांत्य सामन्यात सिंधूचा सामना मिचेल लीशी होऊ शकतो तर सायनाचा ख्रिस्ती गिल्मरशी होईल. सिंधू २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील झालेल्या पराभवाचा वचपा काढून आपल्या पदकाचा रंग बदलण्यास उत्सुक असेल तर सायना दुसऱ्या सुवर्णपदकाच्या शोधात असेल.
पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत ज्याने गतवर्षी ४ सुपरसिरीज विजेतीपदे जिंकून बॅडमिंटन विश्वात खलबली माज केला होता. तो पहिल्या राष्ट्रकुल पदकासाठी आशादायी
विजेत्या मलेशियन जोडीचे आव्हान असेल. अगदीच झालेल्या ऑल इंग्लड आणि इंडोनेशियन मास्टर्स सारखे प्रदर्शन इथे त्यांनी दाखवले तर एक ऐतिहासिक सुवर्णपदक ते खेचू शकतात. मिश्र दुहेरीत प्रणव आणि सिक्कीसमोर इंग्लंडच्या सुवर्णपदकाच्या प्रबळ दावेदार असलेल्या असलेल्या एडकॉक जोडीचे आव्हान असेल.
महिला दुहेरीत अश्विनी आणि सिक्की ही जोडी द्वितीय मानांकित आहे. अश्विनीने ज्वालासोबत २०१० मध्ये सुवर्ण तर २०१४ मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. तर ती यावेळी तिसऱ्या पदकाबद्दल आशादायी असेल. गेल्या ३ राष्ट्रकुल स्पर्धेत मलेशियने मिश्र सांघिक प्रकारात सलग तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. पण यावर्षी भारतीय संघाची डेप्थ बघता भारत हा मिश्रसांघिक प्रकारात सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार आहे.
एकूणच म्हटलं तर बॅडमिंटनमध्ये भारत ३ सुवर्ण (महिला एकेरी, पुरुष एकेरी आणि मिश्र सांघिक) २ रौप्य (पुरुष आणि महिला एकेरी, पुरुष दुहेरी) ३ कांस्य (मिश्र दुहेरी, महिला दुहेरी, पुरुष एकेरी) जिंकून आत्तापर्यंत बेस्ट प्रदर्शन करेल.