बर्मिंघम येथे सुरू असलेल्या २२व्या कॉमनवेल्थ गेम्सच्या (Commonwealth Games) हंगामात भारतासाठी आठव्या दिवसाचा शेवट सुवर्णमय झाला. तर नवव्या दिवशी (६ ऑगस्ट) चाहत्यांची आणि भारतीय हॉकी संघाची निराशा झाली आहे. भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून (INDvsAUS) शूटआउटमध्ये ३-० असा पराभूत झाला आहे. यामुळे भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. तर भारत आता कांस्य पदकाच्या सामन्यात खेळणार आहे.
पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाची आघाडी
उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन्ही संघांनी जबरदस्त सुरूवात केली होती. ऑस्ट्रेलियाने आक्रमक पवित्रा घेत सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करण्यासाठी शॉट मारला होता. तो रोखण्यात सविताला यश आले. भारताला या सत्रात दोन पेनाल्टी कॉर्नर देखील मिळाले होते. मात्र वंदना कटारिया (Vandana Kataria) आणि गुरजीत कौर यांना त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. तर ऑस्ट्रेलियाच्या रेबेका ग्रेनरने १०व्या मिनिटाला गोल करत सामन्यात आघाडी घेतली. यामुळे पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलिया १-० असा पुढे राहिला.
दुसरे सत्र- भारताने गोल करण्याच्या संधी दवडल्या
पुढील दोन्ही सत्रात भारताने सामना बरोबरीत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच ठेवला. भारताने आपले वर्चस्व राखत काउंटर अटॅक सुरूच ठेवला. दुसऱ्या सत्रात भारताला दोन पेनाल्टी कॉर्नर मिळाले, मात्र ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरला गोल करण्यात अपयशी ठरली. नंतर
तिसरे सत्र आणि गोलकिपर सविताचा उल्लेखनीय डिफेंस
तिसऱ्या सत्रात देखील भारताला अनेक पेनाल्टी कॉर्नर देखील मिळाले. मात्र काही संधी भारताने दवडल्या, तर काही गोल व्हिडिओ रेफरलमध्ये नांमजूर करण्यात आले. तर ऑस्ट्रेलियाने सतत काउंटर अटॅक सुरूच ठेवला. तरीही त्यांचे गोलकिपरपुढे एक चालले नाही. यावेळी सविताने विरोधी संघाचे चार गोल रोखले.
चौथ्या सत्रात भारताची बरोबरी
चौथे सत्र भारताला या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी महत्वाचे होते. तसा उत्तम खेळ त्यांनी केलाही. भारताने ४९व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत आणला. पुन्हा एकदा वंदनाने संघासाठी महत्वाची भुमिका बजावली तिने सामना संपण्यास १२ मिनिटे बाकी असताना फ्री हीटवर शॉट मारत संघाच्या सामना जिंकण्याचा आशा जिंवत ठेवल्या. त्यानंतर सामना संपण्यास ५० सेंकद बाकी असताना ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा संधी मिळाली. तो गोल भारताने पुन्हा रोखला.
गोलकिपर सविताची उत्तम कामगिरी आणि पेनाल्टी शूटआउट
या सामन्यात भारताची गोलकिपर सविताने उत्तम प्रदर्शन केले. तिने विरोधी संघाचे अनेक गोल रोखले. यामुळे सामन्याची पूर्णवेळ झाल्याने दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. त्यामुळे पेनाल्टी शूटआउटमध्ये सामन्याचा निकाल ठरणार होता. शूटआउट सुरू झाली असता पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने सुरूवात केली. तो गोल रोखण्यास भारताच्या गोलकिपरला यशही आले. मात्र नंतर समजले की वेळच सुरू झाली नव्हती. यामुळे ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा संधी मिळाली.
लालरेसियामी आणि नवनीत कौर यांच्या गोल करण्याच्या संधी हुकल्या, तर नेहाचा गोल रोखण्यात गोलकिपरला यश आले. शूटआउटमध्ये भारताला ३-० असे पराभूत व्हावे लागले. भारताने हा सामना गमावल्याने त्यांच्या सुवर्णपदकाच्या आशा संपुष्टात आल्या तर संघ आता कांस्य पदकाच्या सामन्यात खेळणार आहे.
FULL TIME!
A tough result to take for #WomenInBlue 💔 Now it's all about the Bronze medal!
AUS 1:1 IND (SO 3:0)#IndiaKaGame #HockeyIndia #B2022 #Birmingham2022 @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/arcTFGnQBT
— Hockey India (@TheHockeyIndia) August 5, 2022
उपांत्य फेरीत झालेल्या चुकीबद्दल आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने माफी मागितली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीटमध्ये लिहीले, ‘ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या सामन्यात पेनाल्टी शूटआउट दरम्यान वेळ सुरू न झाल्याने पुन्हा घेतला गेला. याची तपासणी केली जाणार असून भविष्यात अशा प्रकारच्या चुका होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल.’
The process in place for such situations is that the penalty shootout has to be retaken, which was done. This incident will be thoroughly reviewed by the FIH in order to avoid any similar issues in the future. (2/2)
— International Hockey Federation (@FIH_Hockey) August 6, 2022
कॉमनवेल्थ गेम्समधील भारताचा प्रवास
या स्पर्धेत भारतीय संघ गोलकिपर सविता पुनिया (Savita Punia) हिच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत अ गटात खेळताना पहिल्या साखळी सामन्यात घानाला ५-० असे पराभूत करत उत्तम सुरूवात केली होती. नंतर भारताने वेल्सला ३-१ आणि कॅनडाला ३-२ असे पराभूत केले होते. मात्र यजमान संघाकडून भारताला १-३ असा पराभव स्विकारावा लागला होता. तर ऑस्ट्रेलियाकडून उपांत्य फेरीत शूटआउटमध्ये ३-० असा पराभव झाला. भारत कांस्य पदकासाठी रविवारी (७ ऑगस्ट) न्यूझीलंडशी भिडणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय आहे ‘कुलचा’ जोडी फुटण्याचे कारण? माजी दिग्गजाने सांगितली निवडकर्त्यांची अडचण
इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजाराची बॅट पकडतेय स्पीड, ४ चौकारांसह ठोकले शानदार अर्धशतक
दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्याप्रमाणेच शेवटचे दोन सामनेही उशिरा सुरू होणार? जाणून घ्या टायमिंग