Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्याप्रमाणेच शेवटचे दोन सामनेही उशिरा सुरू होणार? जाणून घ्या टायमिंग

दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्याप्रमाणेच शेवटचे दोन सामनेही उशिरा सुरू होणार? जाणून घ्या टायमिंग

August 6, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit-Sharma-Team-India

Photo Courtesy: twitter/BCCI


वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेचे शेवटचे दोन सामने खेळायचे बाकी आहे. पहिल्या तीन सामन्यांनंतर भारतीय संघ १-२ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये खेळले जाणार आहेत. या सामन्यांसाठी दोन्ही संघ अमेरिकेत दाखल झाले आहेत. मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा सुरू झाला होता. याच पार्श्वभूमीवर चाहत्यांना चौथ्या आणि पाचव्या सामन्याच्या वेळेविषयी प्रश्न पडले आहेत. 

तत्पूर्वी, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला टी-२० सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियम खेळला गेला. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ आजता सुरू झाला होता. भारताने हा सामना ६८ धावांनी जिंकला होता आणि ०-१ अशी आघाडीही घेतलेली. त्यानंतर उभय संघातील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाला ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. खेळाडूंचे साहित्या उशिरा पोहोचल्यामुळे हा सामना काही तास उशिरा म्हणजेच रात्री ११ वाजता सुरू झाला होता. त्यानंतर उभय संघातील तिसरा सामना देखील ९.३० मिनिटांनी सुरू झाला होता. हा सामना भारताने ७ विकेट्सने जिंकला आणि मालिकेत १-२ अशी आघाडी घेतली.

आता उभय संघातील चौथा आणि पाचवा सामना अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये खेळला जाईल. हे सामने अनुक्रमे ६ आणि ७ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्याला उशीर झाल्यानंतर आता शेवटच्या दोन सामन्यांबद्दल चाहत्यांच्या मनात संभ्रम आहे. चला तर जाणून घेऊया शेवटच्या दोन सामन्यांची वेळ.

भारतीय वेळेनुसार फ्लोरियामध्ये सुरू होणारे हे सामने रात्री ८ वाजता सुरू होईल. मालिकेच्या सुरुवातीलाच ही वेळ निश्चित केली गेली होती आणि त्यात कसल्याही पद्धतीचा बदल झाला नाहीये. मालिकेतील सध्या आघाडीवर असलेला भारतीय संघ शेवटच्या दोन सामन्यांध्येही विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. मालिका नावावर करण्यासाठी भारताला अजून फक्त एका विजयाची आवश्यकता आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

भारतापुढे तगड्या इंग्लंडचे आव्हान, उपांत्य सामन्यात ‘या’ मजबूत ११ खेळाडूंना उतरवणार हरमनप्रीत

BREAKING: एका तासात कुस्तीत भारताला तीन गोल्ड; बजरंग-साक्षीपाठोपाठ दीपक पुनियाने रचला इतिहास

विकास कंडोला ठरला प्रो कबड्डी इतिहासातील महागडा खेळाडू; मोडला रेकॉर्ड ब्रेकर परदीपचा रेकॉर्ड


Next Post
Virat-Kohli-Rohit-Sharma

विराट, रोहितसोबत जे घडतंय, तेच सचिन आणि गांगुलीसोबतही घडून गेलंय; बीसीसीआय अधिकाऱ्याचे भाष्य

Cheteshwar-Pujara-Video

इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजाराची बॅट पकडतेय स्पीड, ४ चौकारांसह ठोकले शानदार अर्धशतक

Kuldeep-Yadav-And-Yuzvendra-Chahal

काय आहे 'कुलचा' जोडी फुटण्याचे कारण? माजी दिग्गजाने सांगितली निवडकर्त्यांची अडचण

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143