---Advertisement---

CWG: भारताचे कुस्तीत चार पदके पक्की! साक्षी, बजरंगचा अंतिम फेरीत धमाकेदार प्रवेश

On: शुक्रवार, ऑगस्ट 5, 2022 8:43 PM
---Advertisement---

बर्मिंघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games)२०२२मध्ये भारताच्या कुस्तीपटूंनी धमाकेदार कामगिरी केली आहे. बजरंग पुनिया, दीपक पुनिया, अंशू मलिक आणि साक्षी मलिक यांनी भारताचे पदक पक्के केले आहे. या चौघांनीही त्यांच्या त्यांच्या वजनी गटात उत्तम कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

पुरूषांच्या ६५ किलोच्या वजनी गटाच्या उपांत्य फेरीत बजरंग पुनिया (Bajrang Punia) याने इंग्लंडच्या जॉर्ज रॅमचा १०-० असा पराभव केला आहे. सुवर्ण पदकासाठी त्याचा सामना कॅनडाच्या लॅक्लान मॅकनीलशी होणार आहे.

पुरूषांच्या ८६ किलोच्या वजनी गटाच्या उपांत्य फेरीत दीपक पुनियाने कॅनडाच्या अलेक्झांडर मुरेचा ३-१ असा पराभव केला आहे. तर सुवर्ण पदकासाठी त्याचा सामना नायजेरियाच्या ओडुनायो फोलासाडेशी होणार आहे.

२०१६ मध्ये झालेल्या रियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या साक्षी मलिक (Sakshi Malik) हीने ६२ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कॅमरूनच्या इटने एनगोलेचा १०-० असा पराभव करत सामना जिंकला आहे. सुवर्ण पदकासाठी तिचा सामना कॅनडाच्या ऍना गोन्झालेजशी होणार आहे.

महिलांच्या ५६ किलोच्या वजनी गटाच्या उपांत्य फेरीत अंशू मलिकने श्रीलंकेच्या नेथमी पोरूथोटागेचा १०-० असा पराभव केला. सुवर्ण पदकासाठी तिचा सामना कॅनडाच्या लॅक्लान मॅकनीलशी होणार आहे.

महिलांच्या ६८ किलोच्या वजनी गटात दिव्या काकरान कांस्य पदकासाठी टोंगाच्या टायगर लीली कॉकर हिच्याशी भिडणार आहे. तसेच पुरूषांच्या १२५ किलो वजनी गटात मोहित ग्रेवालचा कांस्य पदकासाठी जमैकाच्या ऍरॉन जॉन्सनशी होणार आहे.

भारताने या स्पर्धेत आतापर्यंत २० पदके जिंकली आहेत. त्यातील १० पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. तसेच भारताने ६ सुवर्ण तर प्रत्येकी ७-७ रौप्य आणि कांस्य पदके जिंकली आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

प्रो कबड्डीच्या सर्वात यशस्वी रेडर ‘प्रदिप नरवाल’ला मिळाले ‘इतके’ लाख

VIDEO | ‘बाएं हाथ का खेल!’, कायरन पोलार्डने एका हाताने कुटल्या १० धावा

प्रो कबड्डी लीगच्या ९व्या हंगामातील पहिला कोट्याधीश मिळाला! नाव फझल अत्राचली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---