---Advertisement---

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी साधली सुवर्ण हॅट्ट्रीक! सात्विक-चिराग जोडीने जिंकले गोल्ड

On: सोमवार, ऑगस्ट 8, 2022 6:18 PM
Satwik and Chirag
---Advertisement---

बर्मिंघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games)२०२२च्या शेवटच्या दिवशी भारताची जबरदस्त कामगिरी सुरूच आहे. भारतीय बॅडमिंटनपटूंनी सुवर्ण पदकांचा पाऊस पाडला आहे. पुरूषांच्या दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने सुवर्ण पदक जिंकले आहे. त्यांनी अंतिम फेरीत इंग्लंडच्या लेन बेन आणि सीन वेंडीवर २१-१५, २१-१३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला आहे.

सात्विकसाईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांनी जिंकलेले सुवर्णपदक भारताचे बॅडमिंटनमधील पुरूष दुहेरीचे पहिलेच सुवर्ण पदक ठरले आहे.

https://twitter.com/thebharatarmy/status/1556616470796218368?s=20&t=zT8iC8IdAOjfitCjN-2u7g

सात्विक आणि चिराग यांनी सामन्याला आक्रमक सुरूवात केली. भारताच्या या जोडीने कोणतीही चूक न करता पहिल्या सेटमध्ये यजमान संघाच्या जोडीला एकही संधी दिली नाही. सात्विक-चिरागने पहिला सेट २१-१५ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र ते काहीसे मागे पडताना दिसले. विरोधी जोडी बेन लेन आणि सीन वेंडीने पुनरागमन केले होते. यासाठी काही वेळ तरी भारतीय जोडी दबावात दिसली. नंतर दोघांनीही जबरदस्त कमबॅक करत सेट २१-१३ असा जिंकला. सरळ दोन सेटमध्ये सामना जिंकत त्यांनी पहिल्यांदाच सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे.

भारतीय बॅडमिंटनचे हे आजच्या दिवसातील तिसरे सुवर्ण पदक ठरले आहे. सात्विक-चिरागच्या आधी महिला एकेरीत पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि पुरूष एकेरीत लक्ष्य सेन यांनी सुवर्ण कामगिरी केली आहे. तर के श्रीकांतने पुरूष एकेरीत कांस्य पदक जिंकले. तसेच महिला दुहेरीत त्रिषा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी कांस्य आणि भारतीय मिश्र संघाने रौप्य जिंकले. यामुळे भारतीय बॅडमिंटनची पदकसंख्या सहा झाली आहे.

भारताने या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदके जिंकली आहेत. यामुळे भारत ६१ पदकांसह पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

रोहित कॅप्टन बनताच टीम इंडियात झाले बदल, आता पाकिस्तान येणार गोत्यात?

BIG BREAKING: आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित कर्णधार, ‘ही’ अनपेक्षित नावेही सामील

CWG 2022: अचंता शरथची टेबल टेनिसमध्ये भन्नाट कामगिरी! भारताला जिंकून दिले २२वे सुवर्ण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---