---Advertisement---

BIG BREAKING: आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित कर्णधार, ‘ही’ अनपेक्षित नावेही सामील

On: सोमवार, ऑगस्ट 8, 2022 9:10 PM
Team-India
---Advertisement---

तब्बल चार वर्षानंतर होत असलेल्या आशिया चषकासाठी भारतीय क्रिकेट निवड समितीने आपल्या संघाची घोषणा केली आहे. १५ सदस्यीय संघात भारताचा नियमित उपकर्णधार केएल राहुलने तसेच माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज विराट कोहलीने पुनरागमन केले आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड व वेस्ट इंडिज दौऱ्यावर शानदार कामगिरी करणाऱ्या दीपक हुडा, आवेश खान व अर्शदीप सिंग यांना संघात संधी दिली गेली आहे.

आशिया चषकासाठीच्या संघात प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांना स्थान मिळाले नाही. हे दोघेही दुखापतग्रस्त असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. तसेच श्रेयस अय्यर, दीपक चहर व अक्षर पटेल हे राखीव खेळाडू संघात असतील.

आशिया चषक २०१६ नंतर प्रथमच टी२० प्रकारात खेळला जाईल. भारताने २०१६ मध्ये झालेला टी२० आशिया चषक तसेच २०१८ वनडे आशिया चषक जिंकला होता. भारताने आतापर्यंत सात वेळा आशिया चषक आपल्याला नावे केला आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकाआधी टी२० आशिया चषक खेळवण्याचा निर्णय आशिया क्रिकेट परिषदेने घेतला होता. श्रीलंका या स्पर्धेचे मूळ यजमान आहेत. मात्र, श्रीलंकेत आर्थिक संकट आल्याने ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळली जाईल.

आशिया चषकासाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.

महत्त्वाच्या बातम्या-

CWG 2022: अचंता शरथची टेबल टेनिसमध्ये भन्नाट कामगिरी! भारताला जिंकून दिले २२वे सुवर्ण

शॉकिंग! शोएब अख्तरची मोठी सर्जरी; हॉस्पिटलच्या बेडवरूनच म्हणतोय, ‘मला फक्त तुमच्या प्रार्थनेची गरज’

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी साधली सुवर्ण हॅट्ट्रीक! सात्विक-चिराग जोडीने जिंकले गोल्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---