कॉमनवेल्थ गेम्स 2026 चे आयोजन स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरात होणार आहे. जे 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार आहेत. या शहरात तब्बल 12 वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा (काॅमन वेल्थ) स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये खेळाडू 10 खेळांमध्ये सहभागी होतील. हे सर्व सामने ग्लासगो येथील चार ठिकाणी होणार आहेत.
पण 2026 च्या राष्ट्रकुल खेळासाठी असे अनेक खेळ काढून टाकण्यात आले आहेत. ज्यात भारताला पदक जिंकण्याची सर्वाधिक शक्यता आहे. यामध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी, स्क्वॉश, टेबल टेनिस आणि कुस्तीचा समावेश आहे. मात्र आता या खेळांनी माघार घेतल्याने भारताच्या पदकांची संख्या कमी होऊ शकते. राष्ट्रकुल 2022 मध्ये भारताने एकूण 61 पदके जिंकली.
कॉमनवेल्थ गेम्स स्कॉटलंडचे मुख्य कार्यकारी जॉन डोईग ओबीई म्हणाले: “आम्ही ग्लासगोला 2026 राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद मिळवून दिल्याने आनंद होत आहे. जेव्हा आम्ही ही संकल्पना एका वर्षापूर्वी एकत्र आणण्यास सुरुवात केली, तेव्हा आमचे लक्ष वेगळं गेम तयार करण्यावर होते. जे खेळ कमी कालावधीत, आर्थिकदृष्ट्या टिकाऊ मार्गाने उच्च गुणवत्तेसह वितरित केले जाऊ शकतात.
Glasgow confirmed as the hosts of the 2026 Commonwealth Games!👏
👀 Read the full announcement here | https://t.co/9FNaxziTdS#Glasgow2026 pic.twitter.com/WGg77QuO3s
— Commonwealth Sport (@thecgf) October 22, 2024
मागील इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या खेळांमध्ये एकूण 72 देश सहभागी झाले होते. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 178 पदके जिंकली असून, त्यापैकी 57 सुवर्णपदके आहेत. स्पर्धेत इंग्लंडने दुसरे, कॅनडाने तिसरे आणि भारताने चौथे स्थान पटकावले होते.
भारताला मागील कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकूण 61 पदके मिळाली, ज्यात 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचा सामवेश होता.
हेही वाचा-
रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्स सोडली? आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी उचलले मोठे पाऊल
IND VS NZ; दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया पुण्यात दाखल; बीसीसीआयने शेअर केला VIDEO
वडिलांची एक चूक, अन् जेमिमा रॉड्रिग्जचे सदस्यत्व रद्द! खार जिमखाना क्लबची मोठी कारवाई