---Advertisement---

प्रतिस्पर्धी खेळाडूला वीट फेकून मारणे बांगलादेशी क्रिकेटपटूला पडले महागात; बोर्डाने ठोठावला मोठा दंड

On: शनिवार, जून 19, 2021 6:09 PM
---Advertisement---

खेळामध्ये अनेकदा खेळाडूंमध्ये वाद विवाद होत असतात. यामध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू अनेकवेळा  एकमेकांशी भांडतात. कधी कधी तर ही भांडणं शाब्दिक वादावरून, थेट हातापायी करण्यापर्यंतही पोहोचतात. असेच काहीसे आता बांगलादेशमधील एका स्पर्धेत पाहायला मिळाले आहे.

बांगलादेशमध्ये सध्या ढाका प्रीमिअर लीग स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेच्या लेजंड ऑफ रुपगंजचा खेळाडू शब्बीर रेहमान आणि शेख जमाल धनमंडी क्लबचे व्यवस्थापक सुल्तान महमूद या दोघांवर वर्णद्वेषी भाषा वापरल्यामुळे ५० हजार बांगलादेशी टकेचा दंड भरावा लागला. दरम्यान, शेख जमालने बुधवारी (१६ जून) शब्बीर आणि त्याचा सहकारी खेळाडू इलयास सनीविरुद्ध ढाका प्रीमिअर लीगचे आयोजन करणारी ‘बीसीबी विंग ढाका महानगर क्रिकेट समितीकडे (लसीसीडीएम) अधिकृत तक्रार दाखल केली होती की, शब्बीरविरोधात त्यांचा खेळाडू इलयास सनीबद्दल वर्णद्वेषी टीकेबद्दल सांगण्यात आले होते.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सांगितले की, सीसीडीएमच्या तांत्रिक विभागाने या प्रकरणात सामील असलेल खेळाडू, क्लब अधिकारी आणि सामना अधिकरी या सर्वांसोबत व्हर्च्युअल सुनावणी केली. तसेच शब्बीर आणि सुल्तानवर दंड लावण्याता निर्णय घेतला. त्याचबरोबर इलयासला सुद्धा चेतावणी देण्यात आली.

बीसीबीच्या माहितीनुसार, शब्बीरवर बांगलादेश क्रीडा शिखा प्रतिष्ठान (बीकेएसपी) ३ मध्ये ओल्ड डीओएचएस क्लब विरुद्ध सामन्यादरम्यान इलयासवर काही कारण नसताना, मैदानाबाहेरून वीट फेकून मारणे आणि त्याच्याबद्दल वर्णभेदी भाषा वापरल्याचाही आरोप लावण्यात आला होता.

शब्बीरबद्दल हे काही नवीन नाही. नुकतेच त्याने सोशल मीडियावर एका क्रिकेट चाहत्याला शिवीगाळ केल्यामुळे त्याच्यावर ६ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. इतकेच नाही, तर शब्बीरने २०१८ला प्रथम श्रेणी सामन्या दरम्यान एका चाहत्याला मारल्यामुळे आपला राष्ट्रीय करारही गमावला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

WTC Final 2021, भारत वि. न्यूझीलंड: टॉस जिंकून न्यूझीलंडचा प्रथम बॉलिंगचा निर्णय; ऐतिहासिक जेतेपदासाठी दोन्ही संघ सज्ज

‘हिऱ्याहूनही जास्त चमकतो माझा घाम’, म्हणत धवनने केला फोटो शेअर; रोहितही झाला इंप्रेस

‘किवींना बालपणीपासूनच स्विंग चेंडूची सवय, पण भारतीयांच तसं नाही,’ दिग्गज गोलंदाज चिंतेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---