प्रो कबड्डीच्या पाचवा मोसम हा क्रीडाजगतातील सलग चालणाऱ्या स्पर्धांपैकी सर्वात मोठा मोसम ठरणार आहे. ह्या मोसमात तब्बल १२ संघ हे ११ राज्यात १३० सामने खेळणार आहेत. त्यात महाराष्ट्र हे एकमेव राज्य असे आहे ज्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरात प्रो कबड्डीचे सामने होणार आहेत.
प्रो कबड्डीमधील पुण्याच्या संघाचे नाव हे पुणेरी पलटण असे असून ह्या संघाचे होम ग्राउंड हे श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी, पुणे हे आहे. भर दिवाळीमध्ये पुण्यातील या भव्य अशा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कबड्डीचे सामने रंगणार असून त्यात सर्व संघ कबड्डीच्या या पाचव्या मोसमाच्या अंतिम टप्प्याकडे जाणाऱ्या मोसमात आपलं नशीब आजमावणार आहेत.
१३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर असे तब्बल ८ दिवस पुण्यनगरीत हे सामने रंगणार असून त्यात एकूण ११ सामने होणार आहे.
त्यांचं हे पूर्ण वेळापत्रक
Oct 13 Pune PUN vs GUJ KOL vs CHE
Oct 14 Pune CHE vs PAL PUN vs MUM
Oct 15 Pune BLR vs UP PUN vs DEL
Oct 16 Pune Rest day Rest day
Oct 17 Pune PUN vs HAR
Oct 18 Pune PAT vs BLR PUN vs JAI
Oct 19 Pune Diwali Diwali
Oct 20 Pune HYD vs KOL PUN vs GUJ
The wait's over, time to mark your 🗓️! Here are all the fixtures of #VivoProKabaddi Season 5! Which Panga are you looking forward to? pic.twitter.com/OLBYaYrSrv
— ProKabaddi (@ProKabaddi) June 28, 2017