मुंबई । देशातील सर्वोच्च क्रिकेटपटूंच्या विरोधात तक्रार दाखल करणारे संजीव गुप्ता यांनी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे आजीवन सदस्यत्व सोडले आहे. गुप्ता यांनी नुकताच भारतीय कर्णधार विराट कोहलीविरूद्ध तक्रार केली होती की, तो आपल्या व्यवसायातील हितसंबंध सांभाळणार्या फर्मच्या सहाय्यक कंपनीचा संचालक आहे.
बीसीसीआय लोकपाल डीके जैन हे त्यांच्या आरोपांचा अभ्यास करत असल्याचे समजते. गुप्ता यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, “संजीव गुप्ता यांनी एमपीसीएच्या आजीवन सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी देशातील अव्वल क्रिकेटपटूंविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
द्रविड भारतीय ज्युनियर संघाचा प्रशिक्षक असल्याने त्याला आयपीएलमध्ये जबाबदाऱ्या स्विकारता येणार नाहीत, अशी तक्रारही याच संजीव गुप्तांनी केली होती.
क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य असताना गुप्ता यांनी सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांच्या विरोधात तक्रार केली होती. या सर्वांना त्यावेळी हे पद सोडावे लागले होते.
विशेष म्हणजे गुप्ता यांचे जवळपास अनेक मुद्दे बरोबर असल्याने व नियमात बसत असल्याने अनेक माजी क्रिकेटपटूंना पदं सोडावी लागली होती.
आता विराट कोहलीच्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. जर तसे झाले तर विराटलाही कॉर्नरस्टोन कंपनीचे पद सोडावे लागू शकते.