---Advertisement---

द्रविड-गांगुलीसोबतली चर्चा उघड करणे वृद्धिमान सहाला पडणार महागात? बीसीसीआय घेऊ शकते मोठा निर्णय

On: शुक्रवार, फेब्रुवारी 25, 2022 3:16 PM
Wriddiman-Saha-Sourav-Ganguly
---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळले गेल्यानंतर भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान सहा (Wriddhiman Saha) चर्चेचा विषय बनला आहे. निवड न झाल्यामुळे सहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासोबत झालेली चर्चा सार्वजनिक केली. आता याच कारणास्तव सहा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंमध्ये सहाचा सहभाग आहे आणि आता त्याने नियमांचे उल्लंघन केले आहे.

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल (Arun Dhumal) यांनी सहाच्या मुद्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “होय, अशी शक्यता आहे की, बीसीसीआय वृद्धिमान सहाला विचारू शकते की, एक करारबद्ध क्रिकेटपटू असण्याच्या नात्याने तो निवड प्रक्रियेसंदर्भातील मुद्यावर अस कसं बोलू शकतो? जोपर्यंत बीसीसीआय अध्यक्षांचा प्रश्न आहे, त्यांनी त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला होता. बोर्डला हे जाणून घ्यायचे असेल की, अखेर बंद खोलीत प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत झालेली चर्चा कशामुळे सार्वजनिक केली.”

अशात बीसीसीआय सहाला कारणे द्या नोटिस पाठवणार का की याविषयी तोंडी विचारणा करणार? या प्रश्नावर बोलताना धुमल म्हणाले की, “आम्ही आतापर्यंत यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. आम्ही व्यस्त आहोत. पण काही दिवसांमध्ये यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.”

खेळांडूद्वारे साइन केल्या जाणाऱ्या वार्षिक करारात एक महत्वाचा नियम आहे. या नियमात असा उल्लेख केला गेला आहे की, कोणताही खेळ, अधिकारी, खेळात झालेल्या घटना, टेक्नॉलॉजीचा वापर, निवड प्रक्रिया किंवा खेळाशी संबंधीत कोणताही इतर मुद्द्यावर कोणतीही टीप्पणी करणार नाही. ही टिप्पणी बीसीसीआयच्या मताच्या विरोधात नसली पाहिजे किंवा संघाच्या हिताविरोधातही नसली पाहिजे.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध निवड न झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वृद्धिमान सहाने सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्याविषयी गौप्यस्पोट केले होते. सहाने सांगितेल्याप्रमाणे सौरव गांगुलींनी सहाला विश्वास दिला होता, की जोपर्यंत ते स्वतः बीसीसीआयमध्ये आहेत, तोपर्यंत त्याला कसलाही अडचण येणार नाही. तर दुसरीकडे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता, कारण निवड समितीमध्ये त्याच्या नावावार विचार केला जात नव्हता. गोष्टी इतक्या लवकर कशा बदलल्या, अशा प्रश्न सहाने उपस्थित केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---