---Advertisement---

हाउज द जोश..!! भारतीय फलंदाजांना लोळवणाऱ्या हेजलवूडने केलाय ‘हा’ मोठा पराक्रम

On: शनिवार, डिसेंबर 19, 2020 11:56 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना ऍडलेड येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची पुरती दैना उडाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघाने दुसऱ्या डावात केवळ ३६ धावांवर आपला डाव घोषित केला. यादरम्यान यजमान संघाचा जबरदस्त वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने मोठा पराक्रम केला आहे.

२०० विकेट्सचा टप्पा केला पार
भारताविरुद्ध दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना हेजलवूडने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने केवळ ५ षटके गोलंदाजी करताना ८ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. यासह त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २०० विकेट्सचा टप्पा पार केला. ही कामगिरी त्याने ९७ कसोटी डावांमध्ये केली.

२०० विकेट्स घेणारा १८ वा गोलंदाज

ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत २०० विकेट्स घेणारा हेजलवूड १८ वा गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा, नॅथन लायन, डॅनिस लिली, मिचेल जॉनसन, ब्रेट ली, क्रेग मॅकडर्मोट, जेसन गिलेस्पी, मिचेल स्टार्क, रिची बेनॉड, ग्रॅहम मॅकेन्झी, रे लिंडवॉल, पिटर सिडल, क्लॅरी ग्रिमेट, मर्व ह्यूजेस, स्टुअर्ट मॅकगिल, जेफ थॉमसन यांनी २०० विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

८ वेळा घेतल्या एका डावात ५ विकेट्स
वेगवान गोलंदाज हेजलवूडने आतापर्यंत खेळलेल्या ५२ सामन्यांत ८ वेळा ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. एका डावात ६/६७ ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे.

७३ वर्षांमधील सर्वात किफायशीर गोलंदाजी
याव्यतिरिक्त त्याने सर्वात कमी धावा देत एका डावात पाच विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. मागील ७३ वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने केलेली ही सर्वात किफायतशीर गोलंदाजी आहे.

पहिल्या डावात घेतली होती केवळ १ विकेट
हेजलवूडने भारताविरुद्ध पहिल्या डावात २० षटके गोलंदाजी करताना ४७ धावा देत केवळ १ विकेट आपल्या नावावर केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

“दुसऱ्या कसोटी सामन्यात नका देऊ संधी”, पृथ्वी शॉच्या फ्लॉप खेळीला पाहून वैतागले समालोचक

विराटच्या पहिल्या बाळाचा पाळणा हालणार ऑस्ट्रेलियात?, माजी ऑसी क्रिकेटरने दिले आमंत्रण

पृथ्वी शॉची खराब फिल्डिंग पाहून भारतीय कर्णधाराचा राग अनावर, मैदानावरच दिली शिवी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---