आशिया कप 2022मध्ये रविवारी (28 ऑगस्ट) भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी खूप मेहनत घेतली आहे. टीम इंडियासाठी देशभरात प्रार्थना सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावर स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला असून भारतीय संघाला आगामी सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय क्रिकेट टीम को Asia Cup 2022 के मैच के लिए शुभकामनाएं।
Best wishes to team India for tomorrow's match.#INDvsPAK https://t.co/YBhC6pu1ej
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 27, 2022
व्हिडिओ शेअर करताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, “माझी खूप खास आठवण आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी मी अनेक वर्षांपूर्वी कराचीला गेले होतो. भारताने जिंकलेला क्षण मी कधीही विसरू शकत नाही. सर्व नेते मग ते भाजपचे असो वा काँग्रेPriसचे, सामना पाहण्यासाठी गेलेल्या सर्वांनीच एवढ्या आनंदात उड्या मारायला सुरुवात केली. 28 ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान आशिया कप सामना आहे. संपूर्ण देशाच्या वतीने, माझ्याकडून आणि संपूर्ण कुटुंबाकडून शुभेच्छा.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsPAK: बड्या बड्या बाता नाही करणार, मैदानात करून दाखवणार; पाक कर्णधाराची हुंकार
‘वो वर्ल्ड कप याद करो..’, भारताला पुन्हा धोबीपछाड देण्यासाठी कर्णधार आझमचे संघाला मोटिवेशन