भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) दिवस-रात्र कसोटी सामना सुरू झाला आहे. हा कसोटी मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या पुर्नबांधणी केलेल्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या काही वेळापुर्वी झालेल्या उद्धाटन सोहळ्यात मोटेरा स्टेडियमचे नाव बदलण्यात आले असून नाव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरुन ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ ठेवण्यात आले. यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपासह बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यावर निशाना साधला आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत गांधींनी लिहिले आहे की, ‘सत्य आपोआप समोर येते. नरेंद्र मोदी स्टेडियम, अडानी एंड, रिलायन्स एंड जय शहाची अध्यक्षता करत आहेत. यासोबत त्यांनी #HumDoHumareDo हा हॅशटॅग जोडला आहे.’
राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
पुर्नबांधणी करण्यात आलेले नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. ६३ एकरमध्ये बांधलेल्या या स्टेडियमची आसन क्षमता १ लाख १० हजार आहे. या स्टेडियमचे नाव सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम असे होते. परंतु उद्घाटनावेळी स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे.
या स्टेडियमचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, क्रीडामंत्री किरण रिजिजू, आदी मान्यवर देखील उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
Beautiful how the truth reveals itself.
Narendra Modi stadium
– Adani end
– Reliance endWith Jay Shah presiding.#HumDoHumareDo
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 24, 2021
या सुविधा आहेत स्टेडियममध्ये
या नवीन स्टेडियममध्ये ७६ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. यातील प्रत्येक बॉक्समध्ये २५ जणांची आसन क्षमता आहे. तसेच ५५ खोल्या असलेले क्लब हाऊसदेखील आहे. तसेच त्यात एक जीम आणि ऑलिंपिक साईज स्विमिंग पूल देखील आहे. त्याचबरोबर या स्टेडियममध्ये ३ प्रॅक्टीस ग्राउंड, १ इनडोअर क्रिकेट ऍकेडमीचीही सुविधा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“पुजाराने द्विशतक झळकावत टीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकून द्यावी,” गृहमंत्रींनी व्यक्त केली इच्छा
आयपीएल २०२१ पुर्वी देवदत्त पड्डीकलची वादळी खेळी, १४ चौकारांसह चोपल्या तब्बल १५२ धावा