भारतीय क्रिकेट संघाचा किंग म्हणजे विराट कोहली आणि विश्व क्रिकेटचे षटकार किंग म्हणजेच युवराज सिंग यांच्या नात्यात दुरावा आला आहे का? विराट आणि युवराज यांच्यात मतभेद होत आहेत का? हे आम्ही नाही म्हणत आहोत. युवराज सिंगच्या सोशल मीडियावरील पोस्ट नंतर असा दावा केला जात आहे. माजी क्रिकेटर युवराज सिंग यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, जी खूप वायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने विराट कोहलीला टॅग न केल्यामुळे या वादाला उधाण आलं आहे.
भारतीय संघाने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचे नाव कोरले आहे. मागच्या 10 महिन्यांमध्ये दुसऱ्या वेळेस भारताने आयसीसी स्पर्धेमध्ये भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे. माजी क्रिकेटर यांनीही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यामुळे आनंद साजरा केला आहे. सर्वांनी टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूचे कौतुक केले आहे. विराट कोहलीने तर जगातील प्रत्येकाच्या मनावर त्याची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. पण युवराज सिंगने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बाकी सर्व खेळाडूंचे खूप कौतुक केले, पण विराटचे नावही घेतले नाही. यानंतरच विराट आणि युवराज मधल्या वादाच्या चर्चां होत आहेत.
षटकारांसाठी मशहूर असलेला युवराज सिंग याने सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये लिहिले की, काय जबरदस्त अंतिम सामना होता. चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या घरी आली. रोहित शर्माने चांगले कर्णधारपद निभावले. ज्याने पूर्ण स्पर्धेत भारतीय संघाला खूप चांगला लीडर म्हणून सांभाळले. जेव्हा आयसीसी स्पर्धा येते तेव्हा रोहित एका वेगळ्याच लयीत दिसतो.
युवराज सिंगने पुढे म्हटले आहे की, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, के एल राहुल, हार्दिक पांड्या यांनी त्या परिस्थितीत संघाची जबाबदारी स्वीकारली जेव्हा टीम दबावत होती. तसेच रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्ती यांनी पूर्ण स्पर्धेत त्यांच्या फिरकीची जादू दाखवली. मोहम्मद शमीने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, पण न्यूझीलंडचे नशीब पुन्हा एकदा फसले.
त्यामध्ये युवराजने त्याच्या पोस्टमध्ये विराटचे नाव तर नाहीच घेतले, पण साधं त्याला टॅग सुद्धा केलं नाही. षटकार किंगने रोहित शर्मा, शुबमन गिल, श्रेयस अय्यर के एल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव वरूण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि मोहम्मद शमी या सर्वांना पोस्टमध्ये टॅग केले. यानंतरच त्या दोघांमध्ये दुरावा आल्याच्या खूप चर्चा रंगल्या आहेत.