जगभरात कोरोना व्हायरस हाहाकार माजवत आहे. याचा परिणाम आता क्रीडा क्षेत्रावरही होत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील उर्वरित 2 सामने रद्द करण्यात आले आहेत. हे उर्वरित दोन सामने काही वेळानंतर घेतले जाऊ शकतात. पण सध्या तरी न्यूझीलंडचा संघ लवकरात लवकर पुन्हा मायदेशी परतणार आहे.
या वनडे मालिकेतील पुढील दोन सामने 15 मार्च आणि 20 मार्चला खेळण्यात येणार होते. परंतु जगभरात कोरोना व्हायरसचा कहर पाहता न्यूझीलंडने सुरक्षिततेला प्राधान्य देत अनेक मोठी पाऊले उचलली आहेत.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (New Zealand Cricket Board) आपल्या सर्व खेळाडूंना मायदेशात परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 14 दिवसांसाठी वेगळे ठेवण्यात येणार आहे.
इतकेच नव्हे तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) संघातील वनडे मालिकेचा पहिला सामना काल(13 मार्च) प्रेक्षकांविना खेळवण्यात आला होता. सिडनी क्रिकेट ग्राऊंड (Sydney Cricket Ground) येथे पार पडलेला हा सामना ऑस्ट्रेलियाने 71 धावांनी जिंकला. पण आता या मालिकेतील पुढील दोन सामने रद्दच करण्यात आले आहेत.
कोरोना व्हायरसला जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) जागतिक साथीचा रोग म्हणून घोषित केले आहे. अनेक मोठ-मोठ्या क्रिकेट स्पर्धाही या व्हायरसच्या कचाट्यात सापडल्या आहेत. यामध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिका, आयपीएल, रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज अशा अनेक स्पर्धांवर कोरोना व्हायरसमुळे परिणाम झाला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
– Blog: कोलकाता टेस्ट: अनेकांच्या लॅपटॉपमध्ये कायमची सेव्ह झालेली ती एक इनिंग
– ब्लाॅग: १४ मार्च २००१ – असे खेळले वीर हे दोन!!!
– …आणि द्रविड, लक्ष्मणने १९ वर्षांपुर्वी इतिहास घडवला!