जगभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (England And Wales Cricket Board) क्रिकेटचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्याचे आवाहन केले. सरकारने नुकत्याच दिलेल्या सल्ल्यानंतर आपण निराश आणि अनिच्छेने हे आवाहन करीत असल्याचे यावेळी ईसीबीने म्हटले आहे.
“आम्ही घेतलेल्या कोणत्याही निर्णयापेक्षा हे वैद्यकीयदृष्ट्या गंभीर असेल. विज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी आम्ही निर्णय घेताना सरकार आणि त्यांच्या सल्लागारांबरोबर कार्य करणे सुरू ठेवेल,” असे ईसीबीने आपल्या अहवालात म्हटले आहे.
या निर्णयानंतर क्रिकेटशी संबंधित कोणतेही प्रशिक्षण, हंगामापूर्वीचे मैत्रीपूर्ण सामने आणि क्रिकेटशी संबंधित कोणतीही प्रक्रिया होणार नाही, असेही ईसीबीने सांगितले.
“येत्या आठवड्याभरात आम्ही क्रिकेटमध्ये कोणत्या प्रकारचे समर्थन आवश्यक आहे हे समजून घेण्यासाठी कार्य करू. विशेषत: स्थानिक क्लब आणि लीग यांची या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या देशाला प्रतिसाद देताना खूप मोठी भूमिका असेल,” असेही ईसीबीने सांगितले.
कोरोना व्हायरसचा (Corona Virus) साथीचा आजार सर्व देशभर पसरू लागल्यामुळे 12 मार्चला इंग्लंडने श्रीलंकाविरूद्धची २ सामन्यांची कसोटी मालिका पुढे ढकलली होती. परंतु काऊंटी क्रिकेटबद्दल अजूनतरी कोणता निर्णय घेण्यात आला नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वेबसाईटवरील माहितीनुसार, जगभरातील १,८४,००० लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. तर ७,५०० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पाकिस्तानचा एकही खेळाडू टीम इंडियात खेळण्याच्या नाही लायक
–तर विश्वचषकाची सेमीफायनलच ठरु शकते धोनीचा अंतिम सामना
–बीडचा सुपूत्र संजय बांगरने नाकारली बांगलादेशची मोठी ऑफर