कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे देशातील जास्तीत जास्त लोक आपापल्या घरांमध्ये राहण्याचा पर्याय निवडत आहेत. परंतु चेन्नईमधील लोकांना याची काहीच चिंता नाही. याच मानसिकतेवर रविवारी (15 मार्च) भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज आर अश्विन भडकला आहे. त्याने निराशा व्यक्त केली आहे.
याबद्दल बोलताना अश्विन (R Ashwin) म्हणाला की, चेन्नईमध्ये असे काहीही नाही. चेन्नईमधील लोक कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) घाबरलेले नाही. त्यांना असे वाटते की या व्हायरसचा उन्हामुळे नायनाट होईल. परंतु हा व्हायरस किती भयानक आहे आणि यामुळे लोकांना स्वत:लाच आपली काळजी घ्यावी लागणार आहे, हे त्यांना माहिती नाही.
“चेन्नईमध्ये लोक सध्या एकमेकांपासून दूर रहात नाही. याचा अर्थ असा होतो, या लोकांना असे वाटते की उन्हाळा येताच हा व्हायरस नष्ट होईल आणि लोकांना काहीही होणार नाही,” असे ट्वीट करत अश्विनने सांगितले.
रविवारी संध्याकाळपर्यंत अधिकृत आकड्यांची चर्चा करायची म्हटलं तर भारतात 107 पेक्षा अधिक कोरोना व्हायरसची प्रकरणे समोर आली आहेत. त्याच वेळी केरळच्या आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार केरळमध्ये कोरोनाची आणखी दोन प्रकरणे आढळली आहेत, जिथे ही संख्या आता 21 पर्यंत वाढली आहे.
देशात आतापर्यंत या व्हायरसमुळे दिल्ली आणि कर्नाटकमधील एका रहिवाश्याचा मृत्यू झाला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
– या दोन टीम इंडियाच्या गोलंदाजांचं नाव जरी ऐकलं तरी फिंच झोपेतून उठून बसायचा
– संपुर्ण माहिती: पुढील १ महिन्यात क्रिकेटमध्ये नक्की कोणत्या कोणत्या…
– तमाम क्रिकेटप्रेमींच्या आठवणीतील दिवस: ८ वर्षांपुर्वी सचिनने केलं होतं…