वेस्ट इंडीजचा ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज केमार रोच सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. काउंटी चॅम्पियनशिप डिविजन एकचा ५३ वा सामना सरे आणि वार्विकशायर यांच्यात खेळला गेला. रोचने या सामन्यात सरे संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याच्या गोलंदाजीतील अनुभव दाखवून दिला. त्याने सामन्यात एक चेंडू असा टाकला, जो पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला.
सरे आणि वार्विकशायर (Surrey vs Warwickshire) यांच्यातील हा सामना २५ जुलै रोजी सुरू झाला. २८ जुलै म्हणजेच गुरुवारी सरे संघाने हा सामना ६ विकेट्सने नावावर केला. त्यांचा वेगावन गोलंदाज केमार रोच (Kemar Roach) याने संघासाठी अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. पहिल्या डावात त्याने ५४ धावा खर्च करून १ विकेट घेतली, पण दुसऱ्या डावात त्याचे प्रदर्शन पाहण्यासारखे होते. दुसऱ्या डावात रोचने ७२ धावा खर्च केल्या, पण यादरम्यान ५ महत्वाच्या विकेट्सही घेतल्या.
सामन्यात गोलंदाजी करताना रोचने एक जबरदस्त चेंडू टाकला. हा चेंडू ज्यांनी ज्यांनी पाहिला, ते पाहतच राहिले. त्याचा हा व्हिडिओ ‘बार्मी आर्मी’ या अधिकृत ट्वीटर खात्यावरून शेअर केला गेला आहे. व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, रोचने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा खातो आणि नंतर फलंदाजाला चकवा देत थेट स्टंप्समध्ये घुसतो.
Kemar Roach 😱pic.twitter.com/ci40QVYUW8
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) July 28, 2022
रोचने टाकलेल्या या उत्कृष्ट चेंडूवर वार्विकशायर संघाचा नाथन मॅकएंड्र्यू बनला. व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला, तर समजते की मॅकएंड्र्यू फलंदाजी करताना कुठेच कमी पडला नाहीये. परंतु चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त स्विंग झाल्यामुळे फलंदाजाला त्याचा अंदाजा आला नाही आणि त्याने विकेट गमावली.
सामन्याचा एकंदरीतच विचार केला, तर शेवटच्या डावात सरेला विजयासाठी २४८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्यांनी संघाने हे लक्ष्य चार विकेट्सच्या नुकासानावर गाठले. त्यापूर्वी पहिल्या डावातही सरेने ३१६ धावा करून वार्विकशायर संघाला मागे टाकले होते. वार्विकशायरने पहिल्या डावात २५३, तर दुसऱ्या डावात ३१० धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO। वॉशिंग्टनचा ‘सुंदर’ बॉल, फलंदाजाचा विषय सॉल्व्ह!
‘आयपीएल’ला टक्कर देण्यासाठी ‘हा’ देश सज्ज! केली नव्या टी२० लीगची घोषणा
वेगाचा बादशहा थांबणार! फॉर्मुला वन चॅम्पियन वेटेलची निवृत्तीची घोषणा; भारताशी होते खास नाते