---Advertisement---

‘हा’ माजी क्रिकेटर आता देणार वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाला प्रशिक्षणाचे धडे

On: शुक्रवार, ऑक्टोबर 2, 2020 6:34 PM
---Advertisement---

क्रिकेट वेस्ट इंडिजने माजी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श यांची वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. वॉल्श यांची पुढील २ वर्षांसाठी म्हणजे २०२२पर्यंत या पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज महिला संघ त्यांच्या देखरेखीखाली वनडे आणि टी२० विश्वचषकाची तयारी करेल.

विशेष म्हणजे, वॉल्श हे यापूर्वी बांगलादेश क्रिकेट संघाचे सहकारी प्रशिक्षक होते. तसेच त्यांनी वेस्ट इंडिज महिला संघासोबत काही काळासाठी काम केले आहे.

५७ वर्षीय वॉल्श यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत १३२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ५१९ विकेट्स आणि ९३६ धावा केल्या होत्या. तर २०५ वनडे सामन्यात २२७ विकेट्स आणि ३२१ धावांची कामगिरी केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्यांची आकडेवारी खूप प्रशंसनीय आहे. त्यांनी ४२९ प्रथम श्रेणी सामने खेळत १८०७ विकेट्स आणि ४४० अ दर्जाच्या क्रिकेट सामने खेळत ५५१ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतरही वॉल्श यांनी अनेक पदांवर कार्य केले. ते आयसीसी हॉल ऑफ फेमचेही सदस्य होते. तर २०१३-१६ पर्यंत वेस्ट इंडिजच्या वरिष्ठ निवड समितीचे सदस्य होते. तसेच १९ वर्षांखालील आणि १५ वर्षांखालील वेस्ट इंडिज संघाचे ते व्यवस्थापक देखील राहिले आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी जमैका क्रिकेट असोसिएशनचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. तर कॅरेबियन प्रीमियर लीगच्या जमैका तलावाह्ज संघाचे गोलंदाजी मार्गदर्शक व सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स संघाचे ते गोलंदाजी प्रशिक्षक होते.

 

महत्त्वाच्या बातम्या-

हैदराबादविरुद्ध मैदानात उतरताच एमएस धोनीच्या नावावर होईल ‘मोठ्या’ विक्रमाची नोंद

चेन्नई-हैदराबाद सामन्यात होऊ शकतात मोठे बदल, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान

मोहम्मद शमीच्या ‘रॉकेट थ्रो’ पुढे मुंबईचा धुरंधर झाला घायाळ, व्हिडिओ होतोय व्हायरल

ट्रेंडिंग लेख-

‘या’ तीन कारणांमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला पाहावे लागले पराभवाचे तोंड

गळ्यात २५ तोळ्याची सोन्याची चैन घालून गोलंदाजी करणारा भारताचा प्रविण कुमार

IPL २०२० : मुंबई आणि पंजाब सामन्यात झाली तब्बल ८ विक्रमांची नोंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---