मुंबई । नॉर्थहेम्प्टनशायरच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे इंग्लंड काउंटी चॅम्पियनशिपचा चार दिवसीय क्रिकेट सामना रद्द करण्यात आला. या खेळाडूला प्राणघातक विषाणूची लागण झाल्याची बातमी समजल्यानंतर, बॉब विलिस ट्रॉफीतील सामना रविवारी रद्द करण्यात आला. कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूची ओळख जाहीर केलेली नाही.
ब्रिस्टल येथे नॉर्थहेम्प्टनशायर आणि ग्लॉस्टरशायर यांच्यात हा सामना सुरु होता. पहिल्या दिवसाच्या लंचब्रेकच्या आधी नॉर्थहेम्प्टनशायरचा खेळाडू कोविड -19 मध्ये पॉझिटिव्ह सापडला, त्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा खेळाडू नॉर्थहेम्प्टनशायर येथे ब्रिस्टलमध्ये दाखल झालेल्या संघाचा भाग नव्हता. कारण तो त्याच्या वैद्यकीय अहवालाची वाट पहात होता. तसेच तो घरी क्वारंटाईनमध्ये होता. पण कोविड -19 ची लक्षणे दिसण्यापूर्वी काही खेळाडू गेल्या 48 तासात त्याच्याशी संपर्कात आले होते.
नॉर्थहेम्प्टनशायरने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खेळाडूंचे हित लक्षात घेता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी)बॉब विलिस ट्रॉफीतील ग्लोस्टरशायर आणि नॉर्थॅम्प्टनशायर यांच्यातील सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.