---Advertisement---

आयपीएलचा उद्धाटनाचा सामना कायमच असतो खास, पहा काय सांगताय आकडेवारी

---Advertisement---

आयपीएल २०२० चा हंगाम येत्या १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. हा हंगाम यावेळी युएईमध्ये होणार आहे. कारण भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणात वाढ होत आहे. त्याच कारणाने यावेळीचा आयपीएल हंगाम भारताबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामाचे वेळापत्रक काल जाहिर झाला आहे.

या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. हा सामना १९ सप्टेंबरला अबुधाबीमध्ये शेख झायद स्टेडियम येथे ७ वाजून ३० मिनीटांनी होणार आहे.

मुंबई इंडियन्स गतविजेता तर चेन्नई सुपर किंग्ज गेल्यावर्षीचा उपविजेता संघ आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केवळ तिसऱ्यांदा भारताबाहेर होत आहे.

या लेखात आपण आयपीएलमधील काही खास आकडेवारीबद्दल जाणून घेऊ –

१. मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स आजपर्यंत स्पर्धेचा पहिला सामना प्रत्येकी ६ वेळा खेळले आहेत. मुंबईने ६ मधील २ तर कोलकाताने ५ सामने जिंकले आहेत.

२. आयपीएलमधील सध्या खेळत असलेल्या ८ संघातील फक्त किंग्स इलेव्हन पंजाब व राजस्थान रॉयल्स संघ स्पर्धेचा पहिला सामना १३ वर्षांत कधीही खेळले नाहीत.

३.आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ ६ वेळा जिंकला आहे व ६ वेळा पराभूत झाला आहे.

४. आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने ४ वेळा प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व यात संघाला २ विजय व २ पराभव पहायला लागले आहेत.

५.आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सीएसकेने ४ वेळा नाणेफेक जिंकली आहे. सलग तीन वर्ष सलग नाणेफेक जिंकण्याचा पराक्रम कोलकाता नाईट रायडर्सने (२०१३, २०१४, २०१५) साली केला आहे.

६. आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ४ वेळा परदेशी कर्णधार संघाचे नेतृत्त्व करताना दिसले. ऍडम गिलख्रिस्ट (दिल्ली डेअरडेविल्स, २०१०), माहेला जयवर्धने (दिल्ली डेअरडेविल्स, २०१३), डेविड वॉर्नर (सनरायझर्स हैद्राबाद, २०१७), शेन वॉटसन (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०१७)

७. हंगामातील पहिल्याच सामन्यात शतक करणारे फलंदाज
१६०- रोहित शर्मा
१५८- ब्रेंडन मॅक्क्युलम
१५७- जॅक कॅलिस
१३८- अंबाती रायडू
१०४- मनिष पांडे

८. आतापर्यंत आयपीएलमध्ये झालेले पहिले सामने –
२०२०- मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
२०१९- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०१८- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२०१७- सनराइजर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०१६- मुंबई इंडियन्स विरुद्ध राइजिंग पुणे सुपरजायंट्स
२०१५- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२०१४- कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२०१३- दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२०१२- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२०११- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२०१०- कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध डेक्कन चार्जर्स
२००९- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२००८- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

महत्त्वाच्या बातम्या – 

रागात मारलेला एक चुकिचा फटका पडला तब्बल २२ कोटींना

खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यानंतर हा मोठा सामना झाला रद्द

ईंट का जवाब पत्थर से! आपल्याला बोल्ड करणाऱ्या गोलंदाजाला चेन्नईच्या धोनीने दिला असे प्रतिउत्तर, पहा व्हिडिओ

ट्रेंडिंग लेख –

भारतीय संघाकडून वनडेत खेळलेले ४ खेळाडू, जे फारसे कुणाला माहीत नाही

आयपीएलमध्ये पर्पल कॅपचे मानकरी ठरलेले ४ भारतीय गोलंदाज

फलंदाजाच्या कानाजवळून ‘झूप’ असा आवाज करत गोलंदाजी करणारे ३ आयपीएल स्टार

Bangalore BCCI Champions Chennai Super KIngs CSK Delhi Capitals Finalist Full Schedule full timetable Governing Council in marathi Inforamtion Information information in marathi IPL IPL 13th Season IPL 2020 IPL Dates Kings XI Punjab kolkata Kolkata Knight Riders Marathi Information Mumbai Indians opening gameS Rajasthan Royals Royal Challengers Bangalore Schedule Semifinal Sourav Ganguly Sunrisers Hyderabad Timetable अंतिम सामना आयपीएल आयपीएल 13वा हंगाम आयपीएल 2020 आयपीएलच्या तारखा उपविजेतेपद किंग्स इलेव्हन पंजाब कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स गव्हर्निंग काऊंसिल चेन्नई सुपर किंग्ज चेन्नई सुपर किंग्स दिल्ली कॅपिटल्स बीसीसीआय बेंगलोर मराठी माहिती मराठीत माहिती माहिती मुंबई इंडियन्स या मैदानात होणार आयपीएलचा शेवटचा सामना राजस्थान राॅयल्स राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर विजेते वेळापत्रक सनरायजर्स हैदराबाद संपूर्ण वेळापत्रक सौरव गांगुली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---