आयपीएलचा 13वा हंगाम 15 एप्रिल 2020 पर्यंत स्थगित करण्यात आला आहे. यानंतरही 15 एप्रिलला आयपीएल होईल की नाही याची कोणतही शाश्वती नाही. यामुळे अनेकांचे मोठे नुकसान होणार आहे.
जर आयपीएलचे दिवस कमी न करता जर 60 खेळवले गेले तर यामुळे होणारे नुकसान हे कमी असेल. शिवाय मैदानावरील स्टाफ, खेळाडू, सामनाधिकारी, बीसीसीआय, सपोर्ट स्टाफ तसेच फ्रंचाईजी यांचे नुकसान बऱ्यापैकी कमी होईल. तसेच प्रायोजकनांही यातून बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहचता येईल. जर असे घडले तर खेळाडूंना ठरल्याप्रमाणे पुर्ण रक्कम मिळेल.
जर आय़पीएलचे सामने व दिवस कमी केले तर यामुळे प्रायोजक व फ्रंचाईजी मालकांचे मोठे नुकसान होईल. याच बरोबर क्रिकेटपटू तसेच अन्य घटकांना मोठा तोटा सहन करावा लागेल. आतापर्यंत जाहीरातींचे जवळपास 90% स्लाॅट विकले गेले आहेत. याचमुळे पुन्हा याबद्दल करार होतील. यातून बीसीसीआयचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच विमान व हाॅटेल इंडस्ट्रीला याचा मोठा फटका बसेल. यामध्ये बीसीसीआयचे अधिकारी व जाहीरातदार मिळून निर्णय घेतील.
जर स्पर्धाचं रद्द झाली तर मात्र मोठे संकट बीसीसीआयवर येणार आहे. यामुळे बीसीसीआयसहित फ्रंचाईजी, खेळाडू, समालोचक, सपोर्ट स्टाफ, सामनाधिकारी तसेच मैदानावरील स्टाफ यांचे मोठे नुकसान होऊ शकते. यात बीसीसीआयचे थेट 4 हजार कोटींचे नुकसान होऊ शकते. तसेच प्रत्येक फ्रंचाईजी खेळाडूंना एकूण 85 कोटी रुपये देणार आहेत त्यातील एकही रुपया खेळाडूंच्या खात्यात जमा होणार नाही. तसेच मैदानावरील स्टाफ, खेळाडू, सामनाधिकारी, सपोर्ट स्टाफ यांनाही काहीही मानधन मिळणार नाही. फ्रंचाईजींचेही मोठे नुकसान होईल. त्यांच्या लोकल रेव्हेन्युला धक्का बसेल.
सर्वात मोठे नुकसान खेळाडूंचेच-
आयपीएलमुळे अनेक गरीब घरातून आलेले खेळाडू चांगले कमाई करु लागले आहेत. अगदी खेड्यापाड्यातून शहरापर्यंत अनेक खेळाडूंना यात संधी मिळाली आहे. प्रत्येक संघ हा सर्व खेळाडूंना मिळून जवळपास 85 कोटी रुपये मानधनाचे देतो. यात एमएस धोनी 15 कोटी, विराच कोहली 17 कोटी तर रोहित शर्मा 15 कोटी आपल्या आयपीएल फ्रंचाईजीकडून घेतात. तसेच अनेक अनकॅप खेळाडू कमीतकमी 20 लाख रुपये मिळवु शकतात. विशेष म्हणजे अनकॅप खेळाडू हे कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नसतात. त्यामुळे पैसे कमवायचा एक चांगला मार्ग त्यांच्याकडे असतो. यामुळे जर आयपीएल रद्द झाली तर या सर्व खेळाडूंचे मोठे नुकसान होऊ शकते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलचे आयोजन होणार एकाच शहरात?
-रोखठोक: …तरीही मांजरेकरांचे कौतुक करणं क्रमप्राप्त
–एकही धाव न करता, हातात साधी बॅटही न घेता स्मिथ-वाॅर्नरची टीम झाली चॅम्पियन