येत्या ६ फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला (3 Matches ODI Series) सुरुवात होणार आहे. हे सर्व सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. या मालिकेसाठी यजमान भारतीय संघाचे खेळाडू अहमदाबादमध्ये आहेत. तसेच पाहुणा वेस्ट इंडिज संघही नुकताच अहमदाबादमध्ये पोहोचला आहे. या उभय संघातील खेळाडू ३ दिवस क्वारंटाईनमध्ये राहतील, त्यानंतर सरावासाठी मैदानावर उतरतील.
तत्पूर्वी भारतीय संघाच्या ताफ्यातून चिंताजनक (Indian Players Covid Positive) वृत्त पुढे येत आहेत. भारतीय संघातील जवळपास ८ खेळाडू कोरोना संक्रमित झाले असल्याचे समजत आहे. स्पोर्ट्स स्टारने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)सह संघातील काही खेळाडूंता अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे कळत आहे. सोमवारी (०१ फेब्रुवारी) भारताचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाल्यानंतर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली गेली होती. त्या चाचणीच्या अहवालात काही खेळाडू कोरोना संक्रमित झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे बीसीसीआय लवकरच या खेळाडूंचे पर्यायी खेळाडू घोषित करू शकते.
महत्त्वाचे म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आधीच शाहरुख खान आणि साई किशोर यांना राखीव खेळाडू म्हणून संघासोबत जोडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पटणा पायरेट्स’चा पुन्हा दरारा, ‘यूपी योद्धां’ना ३७-३५ने धूळ चारत नोंदवला नववा विजय
यष्टीरक्षकांच्या शोधात आहेत फ्रँचायझी, ईशान किशनसह ‘या’ विकेटकिपर्सची लिलावात होणार चांदी!
‘रोहितसेने’तून बाहेर असलेल्या अश्विनचा अनोखा प्रयोग, एका हाताने फलंदाजीचा करतोय सराव- Video