---Advertisement---

कोविड १९ मुळे टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत आदिवासी तरुणांना आयुष्याकडे बघण्याची मिळाली वेगळी संधी

On: सोमवार, फेब्रुवारी 7, 2022 8:15 AM
Tata Open Maharashtra
---Advertisement---

पुणे। कोविड १९च्या साथीच्या रोगाने निःसंशयपणे कहर निर्माण केला आणि अनेकांचे जीवन विस्कळीत केले. परंतु, या काळातही काहींच्या चेहर्‍यावर हसूही आले. या चेहऱ्यावर हसू फुललेल्या काही जणांत नेहा गवाल, छाया आणि देशभरातील काही तरुणांचा समावेश आहे. या तरुणांना आयुष्यात काही तरी करण्याची संधी अनपेक्षितपणे उपलब्ध झाली आणि ती टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेने करून दिली.

या तरुणांना दक्षिण आशियातील एटीपी २५० मालिकेतील असलेल्या एकमेव टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत जागतिक दर्जाचे टेनिस जवळून पाहण्याची संधी मिळाली. कोविड १९ साठी शासनाने आखून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करून बॉल पुरुष, बॉल महिला होण्याची संधी मिळाली.

“सामान्यतः, आमच्याकडे वेगवेगळ्या अकादमीतील मुले असतात. पण दुर्दैवाने, कोविड मार्गदर्शक तत्वांमुळे, यावेळी आम्हाला स्टेडियममध्ये मुले ठेवण्याची परवानगी नव्हती. मी आणि प्रशांत [सुतार] (टूर्नामेंट डायरेक्टर, टाटा ओपन महाराष्ट्र) काय करावे याचा विचार करत होतो आणि मग आम्ही ठरवले की, टेनिसमुळे ज्यांचे आयुष्य बदलले आहे अशा देशभरातील या तरुणांपर्यंत पोहोचायचे आणि त्यांना हा बदलणारा अनुभव आणि संधी देण्याचा निर्णय घेतला”, असे महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे (एमएसएलटीए) सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.

टेनिसचा विकास करणे आणि आदिवासी युवकांना खेळात करिअरच्या संधी निर्माण करून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने, एमएसएलटीएने 2014 मध्ये एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला होता. मुळात ही कल्पना श्रीमती पल्लवी दराडे, आदिवासी विभाग, नागपूरच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त यांची होती आणि त्यांना सुंदर अय्यर आणि प्रशांत सुतार यांची साथ मिळाली.

या कार्यक्रमाने आता अनेकांचे जीवन बदलले आहे कारण हे प्रशिक्षित तरुण देशभरात पात्र प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. या उपक्रमाद्वारे त्यांना कोचिंग, कोर्ट मेंटेनन्सचे प्रशिक्षण देण्यात आले असून, या सर्वांनी पात्र मार्कर बनण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. ते आता ग्राउंडस्पर्सन म्हणूनही काम करू शकतात. विशेष म्हणजे ते स्पर्धा आयोजित करू शकतात इतका अनुभव त्यांनी मिळविला आहे.

“आमची घरची आर्थिक परिस्थिती खूप कठीण होती. मी १६ वर्षांची असताना आदिवासी टेनिस अकादमीमध्ये सामील झाले आणि आता मी हैदराबाद, दिल्ली आणि मुंबई येथील विविध टेनिस अकादमी आणि शाळांशी प्रशिक्षक म्हणून जोडले गेले आहे. टेनिसने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आहे. मी आता महिन्याला ३०,००० रुपये कमावतो. मी माझ्या बहिणीला तिच्या लग्नात आर्थिक पाठबळ दिले आहे आणि नागपुरातील माझ्या आईचे चांगले जीवनही सुनिश्चित केले आहे,” असे 26 वर्षीय नेहा म्हणाली.

टेनिसची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आणि दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत असलेल्या या कार्यक्रमाने या तरुणांचे जीवन बदलले आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहाचा भाग बनण्यास मदत केली आहे. विनम्र पार्श्वभूमीतून आलेले परंतु आता टेनिसमुळे आर्थिक स्थिरतेसह एक चांगले जीवन जगत आहेत, हेच या योजनेचे खरे फलित आहे.

या उपक्रमामुळे आतापर्यंत 80 तरुणांनी त्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले असून त्यापैकी जवळपास 78 जणांना रोजगार मिळाला आहे. ते सर्व एआयटीए लेव्हल 3 प्रमाणित प्रशिक्षक आहेत आणि एक दिवस पंच आणि चेअर अंपायर होण्यासाठी प्रमाणित होण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

“भारतात दर्जेदार तांत्रिक लोकांची सतत कमतरता आहे. मला आशा आहे की या तरुणांना स्वावलंबी बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे खेळाला आवश्यक असलेले अधिकाधिक प्रशिक्षक आणि इतर तांत्रिक अधिकारी मिळतील असे नाही, तर या उपक्रमामुळे टेनिसला प्रोत्साहन मिळण्यासही मदत होईल,” अय्यर पुढे म्हणाले.

पुण्यातील आयुष्यभराच्या संधीने या तरुणांचा उद्देश सोडवला आहे आणि त्यांना विश्वास आहे की आता काहीही शक्य आहे. भविष्यात या कार्यक्रमाची पुनरावृत्ती करण्याचे देखील एमएसएलटीएचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून भविष्यात अधिक यशोगाथा ऐकायला मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत कॅमिल माझरेखचा इटलीचा उदयोन्मुख खेळाडू लॉरेन्झो मुसेट्टीला पराभवाचा धक्का

चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत स्वीडनच्या येमेरचा सनसनाटी विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पोर्तुगालच्या जाओ सौसाचा मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---