आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार मे महिन्यात आयपीएल सुरू असताना बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने २९ सामन्यांनंतर स्पर्धा स्थगित करावी लागली होती. आता उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळले जातील.
दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोरोनामुळे लीगमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. बीसीसीआयने यूएईच्या व्हीपीएस हेल्थकेअरला सलग दुसऱ्या वर्षी भागीदार बनवले असून रुग्णवाहिका, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि कोरोना चाचणी व्यतिरिक्त ही कंपनी लीग दरम्यान आरोग्याशी संबंधित इतर सर्व व्यवस्था पाहील.
असे असतील नियम
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात फक्त ३१ सामने खेळले जाणार आहेत. परंतु, बायो-बबलमध्ये कोरोनाचा प्रवेश होऊ नये यासाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व आठ संघांचे खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ सदस्य दुबई आणि अबूधाबी येथील १४ हॉटेल्स आणि रिसॉर्ट्मध्ये सात दिवस क्वारंटाईन करण्यात आलेले. खेळाडूंची देखभाल करण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांनाही बायो-बबल बाहेर जाण्याची परवानगी नाही.
बायो-बबलची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्याच १४ हॉटेल्समध्ये सामावून घेण्यात आले आहे. आयपीएलसाठी एकूण १४ बायो-बबल तयार करण्यात आले आहेत. यापैकी ८ संघांसाठी, ३ सामनाधिकाऱ्यांसाठी आणि इतर तीन प्रसारक आणि समालोचकांसाठी आहेत.
नर्स व डॉक्टरांची फौज तैनात
माध्यमांच्या बातम्यांनुसार, व्हीपीएस हेल्थकेअरने आयपीएलमध्ये कोविड-१९ व्यवस्थापन करण्यासाठी १०० सदस्यीय संघ तयार केला आहे. प्रत्येक सामन्यासाठी स्टेडियममध्ये दोन स्वतंत्र वैद्यकीय संघ असतील. डॉक्टर, परिचारिकांव्यतिरिक्त लॅब तंत्रज्ञदेखील असतील. लीगच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लागू करण्यात आलेल्या नवीन कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत प्रत्येक खेळाडू आणि अधिकाऱ्यांची दर तिसऱ्या दिवशी कोरोना चाचणी केली जाईल. स्पर्धेदरम्यान २५ हजारांहून अधिक कोरोना चाचण्या होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल १२२ वनडे खेळून एकही शतक, एकही सामनावीर पुरस्कार न मिळालेला क्रिकेटर पुढे झाला वकिल
मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबईविरुद्ध ‘या’ तगड्या प्लेइंग Xiसह उतरेल धोनी, पाहा संभाव्य संघ
महान क्रिकेटरला आहे विश्वास; म्हणाले, ‘कोहली एकदा लयीत येऊद्या मग शतक नव्हे त्रिशतक ठोकेल’