क्रिकेटसाठी मागील एक वर्षापासून कोरोना वायरस मोठा शत्रू बनत चालला आहे. अनेक महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होते. पण आता हळूहळू क्रिकेट पूर्वपदावर येत आहे. अशातच इंग्लंडमध्ये पुन्हा कोरोना वायरसचा हाहाकार सुरू झाला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या आगामी श्रीलंका दौ-यावरबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की 14 जानेवारी पासून सुरु होणारा इंग्लंडचा श्रीलंका दौरा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पार पडेल.
कोरोनामुळे अधिक कडक नियम तयार केले जाऊ शकतात –
श्रीलंका क्रिकेट बोर्डमधील वैद्यकीय समिती नुसार 14 जानेवारीपासून इंग्लंडचा श्रीलंका दौरा सुरू होत आहे व कोरोनामुळे त्यात कुठलाही बदल होणार नाही. मात्र खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियम अधिक कडक केले जाऊ शकतात. एका रिपोर्टनुसार मंगळवारी(22 डिसेंबर) श्रीलंकन क्रिकेट बोर्डची वैद्यकीय समिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय समितीशी चर्चा करणार होती. श्रीलंकन क्रिकेट टीमचे डॉक्टर धमिंडा अट्टानायके यांनी स्पष्ट केले की कोरोना वायरसमुळे दौऱ्यावर काही फरक पडणार नाही.
अट्टानायके यांनी स्पष्ट केले की खेळाडूंच्या सुरक्षिततेबाबत चिंता तर असणार आहेच, मात्र आम्हाला खात्री आहे की दोन्ही देशांमधील हा दौरा व्यवस्थितपणे पार पडेल. इंग्लंड संघ २ जानेवारी रोजी एका विशेष विमानाने श्रीलंकेत रवाना होणार आहे. श्रीलंकेत आल्यानंतर 3 दिवस त्यांना क्वारंटाइन राहावे लागेल. त्यानंतर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी होईल व चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडूंना सराव करण्याची मुभा मिळेल.
इंग्लंड या श्रीलंका दौऱ्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १४ जानेवारीपासून सुरु होईल. तर दुसरा सामना २२ जानेवारीपासून सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘विराट तर गेला, आता पाहू भारतीय संघ कशाप्रकारे उर्जा मिळवणार’
‘अरुण जेटली स्टेडियमच्या स्टँडवरील माझे नाव तात्काळ हटवण्यात यावे’, बिशनसिंग बेदींची धक्कादायक मागणी
ऐकावं ते नवलंच! चक्क प्रखर उन्हामुळे थांबला न्यूझीलंड-पाकिस्तान सामना; चाहत्यांनी उडवली खिल्ली
ट्रेंडिंग लेख –
टॉप ३ : टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावांची खेळी करणारे यष्टिरक्षक
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या ४ गोष्टी
सोळा वर्षे आणि सोळा गोष्टी! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास