कॅरिबियन प्रीमियर लीगमधील फ्रंचायझी संघ जमैका तलावाह्जचे सहाय्यक प्रशिक्षक रामनरेश सरवन हे वैयक्तिक कारणास्तव सीपीएलमधून बाहेर झाले आहेत. सरवन यांच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिज संघाचे माजी फिरकीपटू रयान ऑस्टिन जमैका तलावाह्ज संघाचे सहाय्यक प्रशिक्षकपद सांभाळणार आहेत.
जमैका तलावाह्ज संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ मिलर यांनी त्रिनिदाद न्यूज डेशी बोलताना म्हटले, “सरवन यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे मागितलेल्या सुट्टीला मंजुरी मिळाली आहे. सरवन यांच्यामुळे संघाला खूप फायदा मिळतो. त्यांच्याकडे जो अनुभव आणि माहिती आहे तसेच ज्याप्रकारे त्यांनी इतक्या वर्षांपासून क्रिकेटपटूंना जो सल्ला दिला आहे, त्या सर्वांचे या हंगामात आम्हाला नुकसान होणार आहे.”
विशेष म्हणजे काही काळापूर्वीच सरवन एका वादात अडकले होते. ख्रिस गेलने सरवन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गेलला जमैका तलावाह्ज संघातून मुक्त केले होते. त्यामुळे गेलचा असा विश्वास होता की यामागे सर्वात मोठा हात हा सरवन यांचा होता.
सीपीएल २०२०मध्ये जमैका तलावाह्ज संघाचा पहिला सामना १९ ऑगस्ट रोजी सेंट लुसिया झुक्स संघाविरुद्ध होणार आहे.
१८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या लीगमध्ये ३३ सामने खेळण्यात येणार आहेत. या सर्व सामन्यांचे आयोजन हे केवळ २ स्टेडिअममध्ये होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘मला संघातून वगळण्याचा निर्णय योग्यच होता,’ ४१ शतके ठोकणाऱ्या खेळाडूने केले मोठे वक्तव्य
-इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू झाला जखमी; तरीही ठोकले अर्धशतक
-किंग्ज ११ पंजाबचा त्रिशतकवीर खेळाडू कोरोनातून बरा, खेळणार आयपीएल २०२०
ट्रेंडिंग लेख–
-१९९०मध्ये आयपीएल झाली असती तर हे खेळाडू झाले असते मालामाल
-या महान खेळाडूने सरळ सांगतिले, डीकाॅक नाही होऊ शकत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार
-भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे क्रिकेटमध्ये इतिहास