---Advertisement---

सीपीएलमध्ये ३९ वर्षीय खेळाडूने बाउंड्री लाईनजवळ उडी मारुन घेतला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, सप्टेंबर 9, 2021 9:00 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकला टी २० विश्वचषकासाठीच्या पाकिस्तान संघात संधी मिळाली नाही. असे असले तरी तो त्याच्या उत्तम क्रिकेटचे प्रदर्शन करत आहे. तो सध्या कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) खेळत आहे. तो सीपीएलमध्ये गयाना ऑमेझाॅन वाॅरियर्स संघासाठी खेळत आहे. दरम्यान, बार्बाडोस राॅयल्स आणि गयाना ऑमेझाॅन वाॅरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये शोएब मलिकच्या उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन पाहायला मिळाले आहे.

सीपीएलच्या २० व्या सामन्यामध्ये शोएबने त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले आहे. त्याने या सामन्यात जाॅनसन चार्ल्सचा सर्वांना हैराण करणारा झेल घेतली आहे. बार्बाडोस राॅयल्सचा सलामीवीर फलंदाज चार्ल्सने गोलंदाज मोहम्मद हफीजच्या चेंडूवर हवेत मोठा शाॅट खेळला होता आणि ते सरळ सीमारेषेच्या पलीकेडे जात होता.

मात्र, सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या शोएब मलिकने वयाच्या ३९ व्या वर्षातही हा अवघड झेल घेतला आणि सर्वांना चकीत केले आहे. त्याने हा झेल सीमारेषेजवळ घेतला. एक वेळ अशी आली होती की आता मलिक झेल सोडेल असे वाटत होते, पण त्याने त्याचा तोल जात असल्याचे पाहात झेललेला चेंडू वर फेकला आणि तोल सांभाळत सीमारेषेबाहेर येऊन पुन्हा झेलला. हा झेल पकडून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सोशल मीडियावर शोएबचा हा झेल खूप व्हायरल होत आहे. चाहते त्याचे कैतुक करत आहेत.

सामन्याचा विचार केला तर, बार्बाडोस राॅयल्सने हा सामना ४५ धावांनी जिंकला आहे. सामन्यात प्रथम बार्बाडोसने फलंदाजी केली आणि ८ विकेट्स गमावत १८५ धावा केल्या होत्या. यामध्ये चार्ल्सने २१ चेंडूत ४० धावा केल्या होत्या. तसेच गयाना ऑमेझाॅन वाॅरियर्सने लक्ष्याचा पाठलाग करताना १४० धावांवर त्यांचे सर्व विकेट्स गमावले. सामन्यादरम्यान शोएब फलंदाजीमध्ये अपयशी ठरला आणि केवळ चार धावांवर बाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘तो खेळाडू पाचव्या कसोटी सामन्यात संघात यायलाच हवा’, गावसकरांचा सल्ला

शिखरला भारताच्या टी२० विश्वचषकाच्या संघातून बाहेर करण्याबद्दल मुख्य निवडकर्त्यांनी केला मोठा खुलासा

टी-२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा; डू प्लेसिस, मलानला डच्चू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---