---Advertisement---

कॅरेबियन प्रीमियर लीगचा थरार सुरू! पोलार्ड आणि पूरनचे संघ आमने-सामने

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 8:00 PM
---Advertisement---

आयपीएल व बिग बॅश लीगनंतर जगातील तिसरी सर्वात मोठी टी२० लीग असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या (सीपीएल) नवव्या हंगामाला गुरुवारपासून (२६ ऑगस्ट) सुरुवात झाली. स्पर्धेचा शुभारंभ गतविजेत्या ट्रिबॅगो नाईट रायडर्स व गयाना अमेझॉन वॉरियर्स यांच्यादरम्यान खेळला जात आहे. कायरन पोलार्डच्या नेतृत्वातील ट्रिबॅगो नाईट रायडर्स नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

नवव्या हंगामाला झाली सुरुवात
आयपीएलच्या धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या सीपीएलचा हा नववा हंगाम आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या ट्रिबॅगो नाईट रायडर्स व गयाना अमेझॉन वॉरियर्स यांच्या दरम्यान खेळला जातोय. ट्रिबॅगोचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

तीन आयपीएल फ्रॅंचाईजींचे संघ
सीपीएलमध्ये एकूण सहा संघ सहभागी होत असतात. यावर्षीच्या सीपीएलला भारतीय तडका असणार आहे. कारण, या लीगमधील तीन संघ हे आयपीएल फ्रॅंचाईजींच्या मालकीचे आहेत. मागील तीन वर्षापासून कोलकाता नाईट रायडर्स फ्रॅंचाईजींच्या मालकीचा ट्रिबॅगो नाईट रायडर्स स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. यावर्षी राजस्थान रॉयल्स फ्रॅंचाईजीने बार्बाडोस रॉयल्स तर, पंजाब किंग्स फ्रॅंचाईजीने सेंट लुसिया किंग्स ही फ्रॅंचाईजी विकत घेतलीये. भारतात सीपीएलचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरून करण्यात येईल. या वर्षी एकाच दिवशी दोन किंवा तीन सामने खेळवले जाणार आहेत.

ट्रिबॅगो नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन-
कायरन पोलार्ड (कर्णधार), दिनेश रामदीन, सुनील नरीन, रवी रामपॉल, कॉलिन मुन्रो, डॅरेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स, इसुरू उदाना, टिम सिफर्ट, अकील हुसेन व जेडेन सेअल्स.

गयाना अमेझॉन वॉरियर्स प्लेइंग इलेव्हन-
निकोलस पूरन (कर्णधार), ब्रेंडन किंग, चंदरपॉल हेमराज, शोएब मलिक, शिमरॉन हेटमायर, मोहम्मद हाफिज, ओडेन स्मिथ, रोमारिओ शेफर्ड, नवीन उल-हक, इम्रान ताहीर व अश्मेड नेड.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: शमीच्या शानदार इनस्विंगवर चकला बर्न्स, यष्ट्या झाल्या उध्वस्त

हुश्श! संपला जडेजाचा बळींचा दुष्काळ, ४० गडी बाद झाल्यानंतर…

‘विराट-रोहितमध्ये जिंकण्याची जिद्दच दिसली नाही,’ माजी पाकिस्तानी कर्णधाराची बोचरी टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---