भारतीय पुरुष हॉकी संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकांच्या नावाची नुकतीच घोषणा करण्यात आली. हॉकी विश्वचषकानंतर यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता या जागेवर दक्षिण आफ्रिकेच्या क्रेग फुल्टन यांची वर्णी लागली आहे. एफआयएच हॉकी प्रो लीग या महत्त्वाच्या स्पर्धेत ते संघाशी जोडले जातील.
ग्रॅहम रीड यांनी मोठा काळ भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 41 वर्षानंतर ऑलिम्पिक पदक मिळवले होते. जानेवारी महिन्यात ओडिसा येथे झालेल्या हॉकी विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली नव्हती. त्यानंतर रीड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून मुख्य प्रशिक्षकपदाची जागा रिक्त होती.
🇮🇳👔 It's time for Craig Fulton
Hockey India is delighted to appoint Craig Fulton as the new Chief Coach of the Indian Men's Hockey Team.#HockeyIndia #IndiaKaGame @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/420JodSSnq
— Hockey India (@TheHockeyIndia) March 3, 2023
फुल्टन हे हॉकी विश्वातील नामवंत प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. सध्या 48 वर्षांच्या असलेल्या फुल्टन यांच्याकडे तब्बल 25 वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव आहे. त्यांनी बराच काळ बेल्जियम संघासोबत काम केले. 2018 हॉकी विश्वचषक जिंकणाऱ्या बेल्जियम संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये त्यांचा समावेश होता. तसेच, 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या बेल्जियम संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेले. तत्पूर्वी, 2014 ते 2018 या काळात आयर्लंड हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून देखील त्यांचा अनुभव आहे. त्यांच्या काळात आयर्लंड संघ प्रथमच 2016 रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला. 2015 मध्ये त्यांना एफआयएच कोच ऑफ द इयर पुरस्कार दिला गेलेला.
एफआयएच हॉकी प्रो लीगला 10 मार्चपासून सुरुवात होत आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेत ते संघाला मार्गदर्शन करताना दिसून येणार आहेत. हॉकी इंडियाचे प्रमुख दिलीप तिर्की यांनी त्यांचे स्वागत केले.
(Craig Fulton Join India Mens Hockey Team As Head Coach Hockey India Announced)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेस्सीचा जीव धोक्यात! कुटुंबाच्या सुपरमार्केटवर हल्लेखोरांकडून गोळीबार, स्टार फुटबॉलपटूला धमकी
ब्रेकिंग! विश्वचषकात विक्रमी खेळी करणारा दिग्गज फुटबॉलपटू काळाच्या पडद्याआड, क्रीडाविश्वावर शोककळा