---Advertisement---

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी स्टोक्सऐवजी इंग्लंड संघात जागा मिळालेल्या क्रेग ओव्हरटनची ‘अशी’ राहिलीये आजपर्यंतची कामगिरी

On: सोमवार, ऑगस्ट 2, 2021 1:10 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत संघात ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. मात्र, या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच इंग्लंडला जबरदस्त धक्का बसला आहे. इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने या मालिकेतून माघार घेतली आहे. तसेच तो क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेत असल्याचे त्याने सांगितले आहे.

म्हणून बेन स्टोक्सने घेतला ब्रेक
एप्रिल महिन्यात आयपीएल २०२१ स्पर्धेत खेळताना स्टोक्सला बोटाची दुखापत झाली होती. त्याला त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागली होती. त्यामुळे स्टोक्स अजूनही या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. तसेच त्याला त्याच्या मानसिक आरोग्यावरही लक्ष द्यायचे आहे, त्यामुळे त्याने काहीकाळ क्रिकेटपासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला आहे.

बेन स्टोक्सऐवजी या खेळाडूला इंग्लंड संघात संधी
खरंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वीच भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी १७ खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. या संघात बेन स्टोक्सचेही नाव होते. मात्र, आता स्टोक्सने माघार घेतल्याने इंग्लंड संघात क्रेग ओव्हरटनला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता २ वर्षांनंतर ओव्हरटनला कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. त्याने याआधी अखेरचा कसोटी सामना २०१९ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर येथे खेळला होता.

अशी आहे ओव्हरनची कामगिरी  
ओव्हरटनने २०१७ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या कारकिर्दीत ४ कसोटी सामने खेळले असून १२४ धावा केल्या आहेत आणि ९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ४ वनडे सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने केवळ १८ धावा केल्या असून ४ विकेट्स घेतल्या आहेत.

याशिवाय २७ वर्षीय ओव्हरटनने त्याच्या कारकिर्दीत १०२ प्रथम श्रेणी सामने खेळले असून यात त्याने ३५९ विकेट्स घेतल्या आहेत आणि १ शतक व १३ अर्धशतकांसह २८७१ धावा केल्या आहेत. तसेच तो ७२ अ दर्जाचे सामने खेळला असून यात ९४ विकेट्स घेण्याबरोबरच त्याने ७७४ धावाही केल्या आहेत. तो ५९ टी२० क्रिकेट सामनेही खेळला आहे. यामध्ये त्याने ५४ विकेट्स घेतल्या आहेत आणि २९८ धावा केल्या आहेत.

असा आहे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यांसाठी इंग्लंड संघ –
जो रुट (कर्णधार), जोस बटलर, जॅक लीच, ऑली पोप, जॅक क्रॉली, जेम्स अँडरसन, डॉम बेस, सॅम करन, ऑली रॉबिन्सनस, हसीब हमीद, डॉम सिब्ली, डॅन लॉरेन्स, क्रेग ओव्हरटन, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, मार्क वू़ड, जॉनी बेअरस्टो.

असे आहे इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर

महत्त्वाच्या बातम्या –

कमालच ना! टोकियो ऑलिंपिकमध्ये या खेळाडूने जिंकली तब्बल ७ पदकं

सिंपल बट स्वीट!! विराट अन् अनुष्काच्या ‘त्या’ सिंपल लूकमधील फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष

“कांस्यपदक आमच्यासाठी सुवर्णपदक पेक्षा कमी नव्हे, आता माझी मुलगी मोदींसोबत आईस्क्रीम खाणार”, आई-वडिलांकडून पीव्ही सिंधूचे कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---