क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाजांना स्टंपला लक्ष्य करून गोलंदाजीचा सराव करताना आपण पाहिलं आहे. बऱ्याचदा एका स्टंपला लक्ष्य करून ते गोलंदाजीचा सराव करतात. मात्र, तीन स्टंप्सऐवजी एका स्टंपला लक्ष्य करून अचूक चेंडू फेकणे फार अवघड असते. त्यासाठी सरावाची प्रचंड गरज असते. परंतु सात वर्षाचा एक फिरकीपटू हे अवघड काम सहजपणे करतो.
सात वर्षाच्या भारतीय फिरकी गोलंदाजाच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.तो या लहान वयातही अचूक पद्धतीने गोलंदाजी करतो. त्याची ही गोलंदाजी पाहून लोकांनाही आश्चर्य वाटलं.
इंस्टाग्रामवर मदद अब्बास नावाच्या एका अकाउंटवरून एक व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सात वर्षांचा मूलगा नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करत आहे. तो रनअप घेत येतो आणि स्टंपलाईनच्या बाहेर चेंडू फेकतो. मात्र, टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेत थेट स्टंपवर जाऊन आदळतो. त्यानंतर हा मुलगा आनंद साजरा करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CHPmmA7JC4x/?utm_source=ig_web_copy_link
2007 साली झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिलाच सामना बरोबरीत झाला होता. त्यामुळे ‘बॉल आऊट’ च्या साहाय्याने या सामन्याचा निकाल लागला आणि यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता.
‘बॉल आउट’ मध्ये पाकिस्तानच्या एकाही गोलंदाजाला त्रिफळा उडवता आला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे शाहिद आफ्रिदीसारख्या अनुभवी फिरकीपटूलाही ही कामगिरी करता आली नव्हती.
मात्र, आफ्रिदीलाही न जमलेली गोष्ट हा मुलगा सहजपणे करतो. त्याचा या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आहेत आणि सध्या तो लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
स्मिथ कसोटी क्रिकेटचा ‘किंग’ असला तरी रुट, विलियम्सन अन् कोहली ‘या’ गोष्टीत त्याच्या पुढेच
सामन्यादरम्यान घाबरलेल्या ‘त्या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजाला केएल राहुलचा कानमंत्र
ट्रेंडिंग लेख –
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर