---Advertisement---

सामन्यादरम्यान घाबरलेल्या ‘त्या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजाला केएल राहुलचा कानमंत्र

On: शुक्रवार, डिसेंबर 4, 2020 10:57 AM
---Advertisement---

कॅनबेरा | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारी (2 डिसेंबर ) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कॅमरून ग्रीनने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाकडून वनडेत पदार्पण करणारा तो 230 वा खेळाडू ठरला.

सामन्यादरम्यान जेव्हा ग्रीन फलंदाजीसाठी क्रीजवर आला, तेव्हा तो घाबरला होता. मात्र, भारतीय यष्टीरक्षक केएल राहुल याने त्याला प्रोत्साहित केले. राहुलचे शब्द ऐकून ग्रीनलाही आनंद झाला. सामन्यानंतर ग्रीनने याचा खुलासा केला.

चांगली कामगिरी कर मित्रा – केएल राहुल

सामन्यानंतर बोलताना ग्रीन म्हणाला की, “केएल राहुल उत्तम यष्टीरक्षक आहे. जेव्हा मी फलंदाजी करायला आलो, तेव्हा त्याने मला विचारले, तू घाबरलेला आहे का? त्याच्या प्रश्नाला मी ‘हो’ असे उत्तर दिले. त्यानंतर तो म्हणाला, चांगली कामगिरी कर, मित्रा.”

ग्रीनने भारतीय फिरकीपटूंचं केलं कौतुक

ग्रीन भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजीचा प्रशंसक बनला आहे. क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू या क्रीडा वेबसाईटच्या प्रतिनिधीशी बोलताना ग्रीन म्हणाला की, “भारताचे फिरकीपटू शानदार आहेत. अशी फिरकी गोलंदाजी मी कधीही पहिली नाही.”

मैदानावरील परिस्थिती असते वेगळी

विजयासाठी 303 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ग्रीन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. तो फिरकीपटू कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याला अवघ्या 21 धावा करता आल्या. या खेळीत त्याने एक चौकार आणि एक षटकार ठोकला.

त्याच्या फलंदाजीबद्दल बोलताना ग्रीन म्हणाला, “अशा प्रकारच्या गोलंदाजांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही कितीही फुटेज पहिले किंवा संशोधन केले, तरीही मैदानावर परिस्थिती वेगळी असतें. तो वेगळा अनुभव असतो.”

कोहली उच्च दर्जाचा फलंदाज

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने ग्रीनला भारतीय कर्णधार विराट कोहलीविरुद्ध गोलंदाजी करण्याची जबाबदारी दिली. याबद्दल बोलताना ग्रीन म्हणाला की, “कोहलीविरुद्ध गोलंदाजी करून असं जाणवलं की, तो उच्च दर्जाचा फलंदाज आहे. त्याने माझ्या चेंडूंचा उत्तम प्रकारे सामना केला.”

ग्रीनने चार षटके गोलंदाजीही केली. मात्र,  यामध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

पहिल्या टी२० सामन्यात भारताचा पराभव करून टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी येण्याची ऑस्ट्रेलियाकडे सुवर्णसंधी

चालू सामन्यात कोडच्या साहाय्याने माहिती पुरवल्याबद्दल मॉर्गनचे मोठे भाष्य; म्हणाला…

भारताविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यातून ‘या’ दोन खेळाडूंचे होऊ शकते ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन

ट्रेंडिंग लेख –

गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर

भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर

‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्‍या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---