कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून(४ डिसेंबर) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या टी२० मालिकेआधी ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची वनडे मालिका २-१ ने जिंकली आहे. त्यामुळे या टी२० मालिकेतही ही यशस्वी वाटचाल कायम ठेवण्याची त्यांची इच्छा असेल. या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यातून ऑस्ट्रेलिया संघात दोन खेळाडूंचे पुनरामन होण्याची शक्यता आहे.
मिशेल स्टार्क तंदुरुस्त
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क टी२० मालिकेसाठी तंदुरुस्त झाला आहे. तो भारताविरुद्ध बुधवारी (२ डिसेंबर) तिसऱ्या वनडे सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पण आता तो तंदुरुस्त असून टी२० मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे.
स्टार्क सज्ज मात्र एगरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
स्टार्क जरी तंदुरुस्त झाला असला तरी ऍश्टन एगरच्या पोटऱ्यांच्या स्नायूमध्ये ताण आल्याने टी२० मालिकेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. त्याला भारताविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात खेळताना ही दुखापत झाली होती.
जर एगर शुक्रवारी होणाऱ्या टी२० सामन्यात खेळला नाही तर ऑस्ट्रेलियाला ऍडम झम्पासह गोलंदाजी करण्यासाठी एका फिरकीपटूची कमी भासू शकते. कारण एगर आणि झम्पाने एकत्र खेळलेल्या १५ टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला ९ वेळा विजय मिळाला आहे. तर ५ वेळा ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला असून १ सामना रद्द झाला आहे.
तसेच जर एगर खेळला नाही तर ऑस्ट्रेलियाला पार्ट-टाईम फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंचा पर्याय वापरावा लागेल. त्यांच्याकडे यासाठी ग्लेन मॅक्सवेल आणि मार्नस लॅब्यूशेन हे पर्याय आहेत. तसेच जर प्रामुख्याने फिरकी गोलंदाजी करणारा गोलंदाज ऑस्ट्रेलियाला हवा असल्यास त्यांच्याकडे केवळ मिशेल स्वेप्सनचाच पर्याय आहे. कारण केवळ तोच एक फिरकीपटू म्हणून सध्या ऑस्ट्रेलियाच्या बायोबबलमध्ये ऑस्ट्रेलिया अ संघासह उपस्थित आहे.
मॅथ्यू वेडला मिळू शकते संधी –
दुखापतग्रस्त डेविड वॉर्नर ऐवजी सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यासाठी मॅथ्यू वेडला संधी देऊ शकतात. तसेच वेड यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळू शकतो.
कॅमरॉन ग्रीनचे होऊ शकते टी२० पदार्पण –
२१ वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमेरॉन ग्रीनने भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत पदार्पण करताना सर्वांना प्रभावित केले होते. आता तो बुधवारी टी२० क्रिकेटमध्येही पदार्पण करु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
विलियम्सनचं विक्रमी द्विशतक! ‘हे’ ३ खास रेकॉर्ड करत भल्याभल्यांना टाकलंय मागे
रबाडानंतर ‘हा’ खेळाडूही बाहेर; इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाचा मोठा निर्णय
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव






