भारत आणि पाकिस्तान या देशातील वाद सर्वांना परिचित आहे. याचे पडसाद अगदी क्रिकेटच्या मैदानावरही उमटले आहेत. त्यामुळे आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांव्यतिरिक्त या दोन्ही संघात इतर कोणतीही क्रिकेट मालिका आयोजली जात नाही. परंतु आता भारत आणि पाकिस्तान संघात पुन्हा क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्याच्या निर्णयावर विचार केला जात आहे. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर याने या निर्णायाला विरोध दर्शवला आहे.
गंभीरच्या मते, जोपर्यंत इस्लामाबाद जम्मू आणि काश्मिरमधील सीमेंवरील आतंकवाद बंद करत नाही. तोपर्यंत भारत पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळणार नाही.
क्रिकेटपेक्षा भारतीय जवानांचे जीवन अधिक महत्त्वाचे
गंभीर म्हणाला की, “क्रिकेट ही खूप छोटी गोष्ट आहे. आमच्या सैनिकांचे जीवन त्याहून जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे सीमेपलीकडील दहशतवाद पूर्णपणे संपेपर्यंत भारताचा पाकिस्तानशी कसलाही संबंध नसणार. भारतीय क्रिकेटपटूंना देशाकडून क्रिकेट खेळण्यासाठी अमाप पैसा मिळतो. परंतु भारतीय जवान निस्वार्थपणे देशाची सेवा करतात.”
“मीही भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले आहे. मी माझ्या देशाला कित्येक सामने जिंकून देऊन कुणावर उपकार केलेले नाहीत. परंतु एका व्यक्तीला पाहा, जी चीन किंवा पाकिस्तान सीमारेषेवर आपली सुरक्षा करत आहे. अगदी कमी पैश्यात ते आपले जिवन धोक्यात घालत आहेत. खरे तर तेच आपल्या देशाचे सर्वात मोठे नायक आहेत,” असे पुढे बोलताना गंभीरने सांगितले.
भारतीय जवानांसाठी बोलणे ही आमची जबाबदारी आहे
भारतीय सैनिकांच्या पोशाखाला पवित्र असल्याचे सांगत गंभीर म्हणाला की, “याला घालणारे सैनिक देशासाठी आपले रक्त सांडतात. देशाच्या सुरक्षेसाठी स्वत:चे बलिदान देतात. जर एखादा व्यक्ती असा असेल, जो हा पवित्र पोशाख घालूनही देशासाठी समर्पित होत नाही, त्याने हा पोशाख घालण्याची गरज नाही. भारतीय सैनिक आपल्यासाठी एवढा त्याग करतात; तर कमीतमकी आपण त्यांच्यासाठी आवाज उठवला पाहिजे.”
#WATCH Cricket is a very small thing, lives of our soldiers are more important. So, there should not be any relationship with Pakistan till cross-border terrorism stops: BJP MP Gautam Gambhir pic.twitter.com/PUOArMZZlM
— ANI (@ANI) February 26, 2021
गौतम गंभीरची क्रिकेट कारकिर्द
माजी भारतीय क्रिकेटपटू गंभीरने भारतीय संघाच्या अनेक सामना विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २००३ ते २०१६ या कालावधीत त्याने भारताकडून १४७ वनडे सामने खेळले असून ५२३८ धावा केल्या होत्या. तर ५८ कसोटी सामन्यात ४१५४ धावा आणि ३७ टी२० सामन्यात ९३२ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल २ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘युनिव्हर्स बॉस’चे पुनरागमन, विंडीज टी२० संघात मिळाली जागा