ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ऍडम गिलख्रिस्टने आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) वाढत्या प्रसारावर आणि जागतिक स्तरावरील वर्चस्वावर प्रश्न निर्माण केले आहेत. त्याने आयपीएलच्या एकाधिकाराला क्रिकेटविश्वातील येणारे मोठे संकट म्हटले आहे. तसेच त्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेटला मोलाचा सल्लाही दिला आहे.
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) येत्या बिग बॅश लीगच्या (बीबीएल) हंगामातून बाहेर होण्याची शक्यता आहे. तर तो संयुक्त अरब अमिराती (युएई) टी२० लीगमध्ये खेळू शकतो. यावरूनच माजी यष्टीरक्षक-फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) याने ऑस्ट्रेलियातील खेळाडूंच्या भविष्यावर आणि आयपीएलच्या टी२० लीगमध्ये खेळण्यावर चिंता व्यक्त केली आहे.
युएईच्या या टी२० लीगमध्ये आयपीएलच्या मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या फ्रॅंचायजींचा समावेश आहे. या फ्रॅंचायजींनी युएई टी२० लीगच्या संघांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या लीगमध्ये आयपीएलचे खेळाडूंना खेळण्याची परवाणगी आहे. गिलख्रिस्टने एसईएन रेडिओ कार्यक्रमात म्हटले, “वॉर्नरला बीबीएलमध्ये खेळण्यास परावृत्त करू शकत नाही. या लीगमध्ये वॉर्नरच नाही तर आणखी खेळाडू खेळणार आहेत. आयपीएल फ्रॅंचायजींचा जागतिक स्तरावर दबदबा आहे. त्यांच्याकडे कॅरिबियन प्रीमियर लीगच्या संघांचे अधिकारही आहेत.”
कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जने सेंट ल्युसिया किंग्ज, राजस्थान रॉयल्सने बार्बादोस रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स ट्रिनबागो नाइट राइडर्स हे संघ विकत घेतले आहेत.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या अशा टी२० लीगमध्ये खेळण्याच्या मानसिकतेबाबत गिलख्रिस्टने क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डला सल्ला दिला आहे. त्याने म्हटले, “भविष्यात वॉर्नरचा आदर्श ठेवत अन्य खेळाडूंही त्याचा मार्ग अवलंबतील. यावर क्रिकेट बोर्डने थोडा विचार करायला हवा.”
“जर गिलक्रिस्ट म्हणाला, माफ करा क्रिकेट ऑस्ट्रेलिया, मी वेगवेगळ्या स्पर्धेत आपल्या भारतीय फ्रॅंचायजीं संघासाठी खेळायला जात आहे तर तुम्ही त्यावर प्रश्न विचारू शकत नाही. हा त्याचा विशेषाधिकार आहे,” असेही गिलख्रिस्टने पुढे म्हटले आहे.
गिलख्रिस्टने ज्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती त्याचवर्षी आयपीएलचा पहिला हंगाम खेळला गेला. यात त्याने २००८च्या हंगामात डेक्कन चार्जर्सकडून आयपीएल पदार्पण केले होते. तसेच त्याने ९६ कसोटी सामन्यात ४७.६१च्या सरासरीने ५५७० धावा केल्या. यात १७ शतक, १ द्विशतक आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच २८७ वनडेत ३५.८९च्या सरासरीने ९६१९ धावा करताना १६ शतके आणि ५५ अर्धशतके केली आहेत. त्याने २००८ ते २०१३ या दरम्यान ८० आयपीएलचे सामने खेळले आहेत. त्यातील २००९च्या हंगामात डेक्कन चार्जर्सचे नेतृत्व करताना संघाला पहिला आयपीएलचा किताबही मिळवून दिला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बेअरस्टोचा WWE सुपरस्टार अवतार! मात्र, पुढे घडली दुर्दैवी घटना; पाहा व्हिडिओ
‘एका वनडेचा त्याला काय फायदा?’, भारताच्या माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
आता सगळ्यांना तोंड फुटलंय! विराटवर टीका करणाऱ्यावंर सीएसकेचा खेळाडू भडकला