न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्यात राशिद खानच्या संघाने किवीजचा 84 धावांनी पराभव केला. या सामन्यात राशिद खानने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आणि 17 वर्षे जुना टी-20 विश्वचषक विक्रमही मोडला. या सामन्यात राशीदने शानदार गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या 4 फलंदाजांना आपले बळी बनवले आणि त्यांचे कंबरडे मोडले. त्याने 4 षटकांच्या गोलंदाजीदरम्यान केवळ 17 धावा दिल्या. रशीदने केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन आणि मायकेल ब्रेसवेल यांच्या मोठ्या विकेट घेतल्या.
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात कर्णधाराची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिटोरीच्या नावावर आहे, ज्याने 2007 विश्वचषकाच्या सामन्यात भारताविरुद्ध 20 धावांत चार विकेट घेतल्या होत्या. पण रशीद खानने व्हिटोरीला मागे टाकले आहे आणि कर्णधार म्हणून टी20 विश्वचषक सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल (4/17) करण्याचा विक्रम केला आहे. ओमानचा झीशान मकसूद तिसऱ्या क्रमांकावर आहे. पापुआ न्यू गिनी विरुद्ध 2021 टी20 विश्वचषक स्पर्धेत त्याने 20 धावांत चार विकेट घेतल्या होत्या. या मोसमात तो ओमानचे नेतृत्व करत होता.
टी20 विश्वचषकातील कर्णधाराची सर्वोत्तम गोलंदाजी
राशिद खान 4/17 न्यूझीलंड 2024
डॅनियल व्हिटोरी 4/20 भारत 2007
झीशान मकसूद 4/20 पापूआ न्यू गिनी 2021
टी20 विश्वचषकात पूर्ण सदस्य संघाने केलेली सर्वात कमी धावसंख्या
55 – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई, 2021
60 – न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, चटगाव, 2014
70 – बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड, कोलकाता, 2016
72 – बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुबई, 2021
75 – न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, प्रोव्हिडन्स, 2024*
अफगाणिस्तानने दिलेल्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या 75 धावांत गडगडला. यासह न्यूझीलंडने लज्जास्पद विक्रमांच्या यादीत आपला समावेश केला आहे. खरं तर, पूर्ण सदस्य म्हणून, टीम न्यूझीलंडने टी20 विश्वचषकात आपल्या नावावर पाचव्या सर्वात लहान टोटलची नोंद केली आहे.
महत्तवाच्या बातम्या-
पाकिस्तान विरुद्ध सामन्यासाठी भारतीय फलंदाजांनी कंबर कसली! नेट्स मध्ये केले तीन तास सराव
भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट? सर्वात मोठ्या लढतीपूर्वी जाणून घ्या हवामान अपडेट
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी विराट घालवतोय फॅमिली सोबत वेळ, न्यूयाॅर्कमधील VIDEO व्हायरल