बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केल्याने जगभरातून त्याच्यावर कौतूकांचा वर्षाव होत आहे.
यामध्ये एकेकाळी कायमच भारताच्या फलंदाजांवर तुटून पडणारा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही मागे नाही.
विराटने एजबेस्टन मैदानावर केलेल्या १४९ धावांच्या अविस्मरणीय खेळीबद्दन शोएबने त्याचे जोरदार कौतूक केले आहे.
विराटच्या या खेळीनंतर शोएबने ट्विटरवर विराट कोहलीचे फलंदाजीचे कौशल्य, त्याचे सातत्य आणि यश मिळवण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे विराट सर्वश्रेष्ठ असल्याचे मत व्यक्त केले आहे.
What a century @imVkohli!!!
The last time he went to England he failed miserably, but this time he has improved so much shows what an amazing player he is and also his dedication and determination.He proved every one wrong on this tour!!#viratkohli #ENGvsIND— Shoaib Akhtar (@shoaib100mph) August 3, 2018
तसेच या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजीचा बुरुज ढासळत असताना तळातील फलंदाजांना सोबत घेत भारतासाठी विराट तारणहार ठरला असेही शोएब अख्तर त्याच्या पुढच्या ट्विटमध्ये म्हणाला.
Virat quality of batting amazes me that he has the ability to score runs with lower order @ the same strike rate with top order which is incredible…I think virat kohli is the benchmark for world batsman’s to follow ..
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) August 3, 2018
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी (2 आॅगस्ट) पहिल्या डावात 149 धावांची शतकी खेळी केली होती.
या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांसमोर नांगी टाकली असताना तळच्या फलंदाजांना हाताशी घेत विराटने किल्ला लढवत इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-पहिली कसोटी: कोहली-कार्तिक जोडीने टीम इंडियाला सावरले!
-कभी कभी लगता हैं कोहली ही भगवान हैं