भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यातील बॅट आणि बॉलमधील युद्धाला भारताच्या २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात सुरवात झाली होती.
२०१४ सालच्या इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यात अँडरसनने विराटला त्रस्त करत तब्बल चार डावात स्वस्तात माघारी धाडले होते.
२०१४ च्या कसोटी मालिकेत विराटच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात निराशाजनक कामगिरी झाली होती. या मालिकेतील पाच सामन्यात विराटला फक्त १३४ धावा करता आल्या होत्या.
त्यामुळे भारताच्या या इंग्लंड दौरात विराटची कसोटी मालिकेत कामगिरी कशी होणार याबद्दल साऱ्या क्रिकेट जगताला उत्सुकता लागली होती.
मात्र इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातच विराटने जबरदस्त शतक झळकावत या कसोटी मालिकेला दिमाखात प्रारंभ केला.
त्यानंतर विराटचा प्रतिस्पर्धी असलेल्या जेम्स अँडरसनने आपले मौन अखेर सोडले आहे.
“मी भारताच्या पहिल्या डावात विराटला सातत्याने एका टप्प्यावर गोलंदाजी केली. मला आशा होती की सतत ऑफ स्टंपवर गोलंदाजी केल्यास विराट माझ्या जाळ्यात अडकेल. मात्र त्याने ऑफ स्टंपवरील चेंडू सोडत संयमी फलंदाजी केली.”
“भारताच्या पहिल्या डावतील पहिल्या ३२ षटकात मी १५ षटके गोलंदाजी केली. कोहली विरुद्ध इतिहास माझ्या बाजूने आहे. त्यामुळे कर्णधार जो रुटला अपेक्षा होती की, मी विराटला बाद करेन.” असे जेम्स अँडरसन तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर एका क्रीडा वृत्तवाहीनीशी बोलताना म्हणाला.
भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भाराताचा कर्णधार विराट कोहलीने भारताच्या पहिल्या डावात १४९ धावांसह दमदार शतक झळकावले.
भारताच्या पहिल्या डावात आघाडीचे फलंदाज एका मागून एक बाद होत असताना विराटने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत अप्रतिम खेळी केली केली.
एकवेळ इंग्लंड भारतावर मोठी आघाडी मिळवण्याची शक्यता असताना विराटच्या कर्णधार पदाला साजेशी खेळीने इंग्लंडचा भ्रमनिरास केला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-पहिली कसोटी: भारत-इंग्लंडचे गोलंदाज चमकले; दोन्ही संघांना विजयाची समान संधी
-पहिली कसोटी: कोहली-कार्तिक जोडीने टीम इंडियाला सावरले!