ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे.
या भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया दोन चार दिवसीय कसोटी सामने आणि भारत अ, भारत ब आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्या विरुद्ध एकदिवसीय चौरंगी मालिकेत खेळणार आहे.
मंगळवारी (24 जुलै) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या चौरंगी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया अ संघाची निवड केली.
यामध्ये कसोटी संघाचे नेतृत्व वरीष्ठ संघातील अष्टपैलू मिचेश मार्शकडे तर एकदिवसीय संघाचे नेतृत्व ट्रेविस हेडकडे देण्यात आले आहे.
भारत अ, भारत ब, दक्षिण आफ्रिका अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील चौरंगी मालिकेला 17 ऑगस्टला सुरवात होणार आहे.
भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ यांच्यात पहिला कसोटी सामना 2 ते 5 सप्टेंबर तर दुसरा कसोटी सामना 8 ते 11 सप्टेंबर या दरम्यान होणार आहे.
एकदिवसीय चौरंगी मालिकेसीाठी ऑस्ट्रेलिया अ संघ-
ट्रेविस हेड (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (उप कर्णधार), अॅस्टन अॅगर, पीटर हॅड्सकाँब, उस्मान ख्वाजा, मॅर्नस लॅब्सचेज्न, माइकल नेसर, जोएल पॅरिस, मॅट रेनशॉ, जे रिचर्डसन, डी आर्ची शॉर्ट, बिली स्टॅनलेक, मिच स्विपसन, क्रिस ट्रिमेन आणि जॅक विल्डरमॅथ.
कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया अ संघ-
मिचेल मार्श कर्णधार),अॅलेक्स कॅरी (उप कर्णधार), अॅस्टन अॅगर, ब्रॅंडन डॉगेट, पीटर हॅड्सकाँब, ट्रेविस हेड, जॉन हॉलंड, उस्मान ख्वाजा, माइकल नेसर, जोएल पॅरिस, कॉर्टिस पॅटर्सन, मॅट रेनशॉ, मिच स्विपसन आणि क्रिस ट्रिमेन.
महत्त्वाच्या बातम्या-
-यु मुंबा आता मुंबापुरीच्या बाहेर! महाराष्ट्रातील हे शहर होणार नवे होम ग्राऊंड!
-टीम इंडियाला सराव सामन्याला दिले भंगार मैदान, संघव्यवस्थापणाने घेतला मोठा निर्णय