भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या पिंक बाॅल कसोटी सामन्यांची जागा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बदलली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या महिला क्रिकेट सामन्यांचा जागा बदलल्या गेल्या आहेत. या दोन संघांमध्ये पुढच्या महिन्यात ३ एकदिवसीय, ३ टी२० आणि एक पिंक बाॅल कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यासाठी २९ ऑगस्टला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. मात्र रवाना होण्याआधी वेळापत्रक बदलल्याची माहिती समोर आली आहे.
१९ सप्टेंबरपासून सुरू होणारी मालिका आता २ दिवस उशीरा सुरू होईल. भारत आणि ऑस्ट्रेलियात होणारा पिंक बॉल कसोटी सामना वाका स्टेडियमवर खेळला जाणार होता. मात्र, सध्याची स्थिती पाहता हा सामना क्वींसलँडच्या कैरारा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार असे समजते की, कसोटी सामन्यांसोबत एकदिवसीय सामन्यांची जागाही बदलली गेली आहे. एकदिवसीय सामने सिडनीमध्ये खेळले जाणार होते. पण आता क्वींसलँँडच्या मकाया स्टेडियममध्येच हे सामने खेळले जाणार आहेत. ऑस्ट्रेलिया देश कोरोना महामारीमुळे खूप प्रभावित झाला आहे आणि याच पार्श्वभूमीवर मेलबर्न, पर्थ आणि सिडनीमध्ये कोणताच क्रिकेट सामना खेळला जाणार नाही. अनेक शहरांमध्ये निर्बंध लावले गेले आहेत आणि याच स्थितीला पाहता क्रिकेट ऑस्ट्रेलियालाने वेळापत्रकात बदल केला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, याचा अर्थ आहे सिडनी, मेलबर्न आणि पर्थमध्ये सामन्यांचे आयोजन केले जाणार नाही. या शहरांमध्ये सारखे-सारखे निर्बंध लावले जात आहेत. याच कारणांमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय आणि आणि टी२० मालिका सिडनीच्या बाहेर घेण्यास भाग पडले आहे.
वेळापत्रकानुसार भारतीय संघ २९ ऑगस्टला चार्टर्ड विमानाने दुबईला रवाना होणार आहे आणि तेथून दुसऱ्या विमानाने ब्रिस्बेनसाठी रवाना होईल. संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर दोन आठवडे विलगीकरणात राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
दुखापतीमुळे जडेजाचे चौथ्या कसोटीत खेळणे अनिश्चित, बड्या क्रिकेटरने सुचवली ‘ही’ २ नावे
मध्यक्रमातील खेळाडूंच्या संघर्षात रहाणेचे अपयश दुर्लक्षित, पण आता ‘या’ शिलेदारामुळे सुट्टी पक्की?
‘या’ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाचा राजीनामा, येत्या टी२० विश्वचषकासाठी टीम ठरू शकली नाही पात्र