मुंबई । कोरोना विषाणूच्या संकटामुळे क्रिकेट जगत मागील काही दिवसांपासून ठप्प झाल्याने जगातील क्रिकेट खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटात सापडले आहेत. या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी कडक धोरण अवलंबले जात आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बोनसमध्ये कपात केली आहे आणि 40 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया ‘अ’संघाचा दौरा देखील रद्द करण्याचा निर्णय नवे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी घेतला आहे.
मंगळवारी केविन रॉबर्ट्स यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी निक हॉकले यांची नुकतीच अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पदभार घेताच त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 या वर्षातील 4 कोटी डॉलर इतक्या अतिरिक्त खर्चाची कपात केली आहे.
यासोबतच ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचे पुढील सर्व दौरे रद्द करण्यात आले आहे. हे दौरे रद्द झाल्याने युवा खेळाडूंच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आर्थिक परिस्थितीतून सावरण्यासाठी असे कटू निर्णय घ्यावे लागले, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
2021 या वर्षातील ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या दौऱ्यासोबतच क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनचे सर्व सामने, फॉक्स क्रिकेट राष्ट्रीय प्रीमियर क्रिकेट टी20 आणि टोयोटा सेकंड इलेव्हन स्पर्धा देखील थांबवण्यात आल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव वाॅ व रिकी पाॅटींगबद्दलही कोणता ठोस निर्णय अजून झालेला नाही. परंतु संघाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, स्टिव वाॅ व रिकी पाॅटींगसारखे मोठे दिग्गज मोठ्या क्रिकेट मालिकांसाठी संघासोबत असू शकतात. परंतु याबद्दल त्यांनी ठोस काही सांगितले नाही.
ट्रेंडिंग घडामोडी –
धक्कादायक! १९ वर्षांखालील महिला क्रिकेटपटूने केली आत्महत्या
मोठी बातमी: ७ वर्षांच्या बंदीनंतर श्रीसंत या संघाकडून पुनरागमन करण्यास सज्ज
४ धावा देत ६ विकेट्स टीम इंडियाकडून घेण्याच्या ऐतिहासिक कामगिरीला झाली ६ वर्ष