कोरोना व्हायरस या जागतिक महामारीमुळे क्रीडा जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्याला क्रिकेट क्षेत्रही अपवाद राहिले नाही.
भारतीय क्रिकेट बोर्डाचे तर यात मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बीसीसीआय एकाच वेळी दोन वेगवेगळे संघ मैदानावर उतरविण्याचा विचार करत आहे. यावेळी भारतीय संघाची मर्यादीत षटकांचा एक संघ व कसोटीचा दुसरा संघ असा विचार बीसीसीआय सध्या करत आहे.
यामुळे सध्या जे नुकसान झाले आहे ते बऱ्यापैकी भरुन निघू शकते.
स्पोर्ट्स स्टारशी बोलताना एक बीसीसीआयचा एक अधिकारी म्हणाला, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कधी सुरु होईल हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. परंतु यावेळी बीसीसीआयशी जोडलेल्या सर्वांच्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. यामुळे एक पर्याय असा आहे की दोन संघ निवडले जावेत. यात एक संघ टी२० तर दुसरा संघ कसोटी सामने खेळेल.
असं करताना प्रशिक्षकांचा जो स्टाफ आहे त्यावरही काम करावं लागले. २०१७मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने असं केलं आहे. २०१४मध्ये २२ फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध टी२० सामना एॅडलेड येथे खेळला होता तर २३ फेब्रुवारीला पुण्यात ते कसोटी सामना खेळत होते. यासाठी ऑस्ट्रेलियाने दोन संघ तयार केले होते, असेही तो अधिकारी पुढे म्हणाला.