कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतात बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आलेले नाही. मात्र, दीर्घ काळानंतर भारतात क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाला सुरुवात झाली आहे. सर्व खबरदारी घेऊन 24 नोव्हेंबर पासून कोलकातातील ईडन गार्डन या स्टेडियममध्ये बंगाल टी20 चॅलेंज या स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
दोन क्रिकेटपटुंना झाली कोरोनाची लागण
ही स्पर्धा सुरु होण्याच्या अगदी काही दिवसाआधीच खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. प्रथम, बंगालचा क्रिकेटपटू अभिमन्यू ईश्वरन याला कोरोनाची लागण झाली होती. आता दोन खेळाडूंसह एकूण चार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शुक्रवारी (20 नोव्हेंबर) पूर्व बंगालचा खेळाडू अभिषेक रमण आणि मोहन बागान संघामधील खेळाडू हृतिक चटर्जी यांच्यासह दोन अधिकाऱ्यांचा कोव्हिड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळला.
दीप चॅटर्जी आणि पार्थ सेन हे अधिकारीही आढळले कोरोना पॉझिटिव्ह
रमण आणि हृतिक व्यतिरिक्त कोलकाता कस्टमचे अधिकारी दीप चॅटर्जी आणि भ्रष्टाचार विरोधी समितीचे अधिकारी पार्थ प्रतिम सेन यांचा कोव्हिड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
लॉकडाऊननंतर भारतात पहिल्यांदाच होणार क्रिकेट सामन्यांचे आयोजन
जैव सुरक्षित वातावरणात 24 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत मोहन बागान आणि पूर्व बंगालसह सहा क्लब सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसह लॉकडाऊननंतर भारतात क्रिकेटचं पुनरागमन होणार आहे.
वैद्यकीय पथक घेणार काळजी
बंगाल क्रिकेट असोसिएशनने (कॅब) एका निवेदनात म्हटले आहे की “हॉटेलमध्ये पोहोचण्याच्या एक दिवस आधी 142 जणांची कोव्हिड -19 चाचणी घेण्यात आली होती, त्यामधून चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले आहे. त्यांना कॅबच्या वैद्यकीय पथकाकडे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.”
स्पर्धेत खेळले जातील 33 सामने
या स्पर्धेत एकूण 33 सामने खेळले जातील. मनोज तिवारी, श्रीवत गोस्वामी हे नावाजलेले खेळाडूही या स्पर्धेत खेळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सामना संपल्यावर विराट थेट सुर्यकुमारकडे गेला अन् म्हणाला…
“आपल्या संस्कृतीत दोन कर्णधार होऊ शकत नाही, विराटला त्याच्या पदावर राहू द्या”
अविश्वसनीय! ताशी १४८ किमी वेगवान चेंडूवर ख्रिस लिनने मारला तब्बल १२१ मीटरचा षटकार, पाहा व्हिडिओ