मुंबई । जगातील दिग्गज खेळाडूंपैकी एक भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. क्रिकेटच्या मैदानावर त्याला चॅलेंज देणे एक अवघड काम आहे, पण एका वीस वर्षांच्या मुलाने धोनीला आव्हान दिले आहे. कॅरी मिनाती असे त्याचे नाव असून तो पब्जी चॅम्पियन आहे. धोनीसोबत त्याला पब्जी गेम खेळायची इच्छा असून या खेळांमध्ये त्याने धोनीला आव्हान दिले आहे.
कॅरीचे मूळ नाव अजय नागर असून गेल्या पाच वर्षांपासून तो पब्जी गेम खेळतोय. फरिदाबादच्या राहणारा हा मुलगा मोठ मोठ्या अभिनेत्यांची मिमिक्री करतो. तो रोज पाच तास पब्जी खेळतो. नागर या फॅशनच्या कारणामुळे बारावीची परीक्षा दिली नाही. वयाच्या पंधराव्या वर्षांत त्याने स्वत:चे यूटय़ूब चॅनल सुरू केले होते. महेंद्रसिंग धोनी हा नागरचा आवडता खेळाडू असून त्याला धोनीसोबत पब्जी गेम खेळू इच्छितो.
लॉकडाऊनमुळे सध्या धोनी रांची येथील त्याच्या फार्म हाऊसवर आहे. याचदरम्यान धोनीची पत्नी साक्षी ही धोनीवर नाराज असल्याचे सोशल मीडियावर फोटो शेअर करत साक्षीने सांगितले. धोनी आणि साक्षीचा हा फोटो खूप मजेदार आहे ज्यात धोनी बेडवर झोपला असून त्याचे त्याचे दोन्ही पाय साक्षीच्या वटीत आहेत. फोटोत साक्षी धोनीचा पायाचा अंगठा तोंडाने चावण्याचा प्रयत्न करत आहे.