fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्टवर मॉडेलने लावला गंभीर आरोप

मुंबई । जगातील सर्वात वेगवान धावपटू उसैन बोल्ट नुकताच बाप झाला आहे. आपण बाप होणार ही आनंदाची बातमी फॅन्सला बोल्टने जानेवारी महिन्यातच दिली होती. जमैकाचे पंतप्रधान ऍन्ड्रू होलनेस यांनी सोशल मीडियावर बोल्टला मुलगी झाल्याबद्दल शुभेच्छा संदेश दिले होते. याच उसेन बोल्टवर आता एका ब्रिटिश मॉडेलने गंभीर आरोप केले आहे. बोल्टने त्याच्या मुलीच्या जन्मा अगोदर मॉडेलला तिचे अश्लील फोटो पाठवण्यासाठी सांगितले होते.

22 वर्षीय ब्रिटिश मॉडेल शरी हॉलीडे हिला बोल्ट विवाहित असल्याचे माहित नव्हते. गेल्या काही दिवसांपासून बोल्ट शरीच्या संपर्कात होता. बोल्टच्या सांगण्यावरून शरीने तिचे अश्लिल फोटो बोल्टला पाठविले. त्यानंतर तू खूपच हॉट असल्याची प्रतिक्रिया बोल्टने दिली होती.

पंतप्रधानांनी बोल्टला शुभेच्छा दिल्यानंतर शरीला माहीत झाले की बोल्ट हा विवाहित आहे. बोल्ट विवाहित असूनही असे वागतो याचा शरीला चांगलाच धक्का बसला.

द सन या वृत्तपत्राला मुलाखत देताना शरी म्हणाली की, मागील वर्षी लंडन येथे एका नाईट क्लबमध्ये दोघांची पहिल्यांदा मुलाखत झाली. बोल्ट स्वतःहून शेरीचा टेबलवर येऊन बोलू लागला. त्यानंतर त्याने तिला हॉटेलच्या रूमवर भेटण्यासाठी बोलविला होता. त्यांनंतर दोघेही एकमेकाला रोमँटिक मेसेज पाठवत होते.

You might also like