बॅसेंटर | विंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात, शनिवारी (२८ जुलै) वार्नर पार्क, सेंट्स किट येथे विंडिजच्या ख्रिस गेलने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
या सामन्यात ख्रिस गेल सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत शाहिद आफ्रिदी बरोबर संयुक्तपणे अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.
या सामन्यात ख्रिस गेलने ७३ धावांची खेळी करत ६ चौकार आणि ५ षटकार लगावले.
या डावातील ५ षटकारांसह त्याने शाहिद आफ्रिदीच्या ४७६ षटकारांची बरोबरी केली.
शाहिद आफ्रिदीने ५२४ सामन्यात ४७६ षटकार मारले आहेत. तर क्रिस गेलला ४७६ षटकार मारायला फक्त ४३४ सामने घेतले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
४७६-आफ्रिदी
४७६-गेल
३९८-मॅक्क्युलम
३५२-जयसुर्या
३४२-धोनी
३२८-डीविलियर्स
२९१-रोहित शर्मा #WIvBAN #BANvWI @AdityaGund @MarathiBrain @MarathiRT @kridajagat @Maha_Sports @BeyondMarathi @HashTagMarathi @CrazyThakare— Sharad Bodage (@SharadBodage) July 30, 2018
बांगलादेशने या सामन्यात विंडिजला १८ धावांनी पराभूत करत ही मालिका २-१ ने जिंकली.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ६ बाद ३०१ धावा केल्या होत्या.
विडिंजचा संघ या ३०१ धावांचा पाठलाग करताना ५० षटकात ६ बाद २८३ धावाच करु शकला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज:
476 षटकार – शाहिद आफ्रिदी / ख्रिस गेल
398 षटकार – ब्रेंडन मॅक्यूलम
352 षटकार – सनथ जयसुर्या
342 षटकार – एमएस धोनी
328 षटकार – एबी डेविलियर्स
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अॅंडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
-ब्रिटिश जनतेला लवकरच कळेल, कोहली काय चीज आहे!