क्रिकेटविश्वात समलोचन करताना काही गोष्टी अशा सतत घडतात की, ज्या कधीकधी चर्चेचा विषय बनतात. तर काही वेळा त्या वादाचे रूप धारण करतात. यामध्ये खूप असे माजी क्रीडातज्ञ आणि समलोचक आहेत, ज्यांचे आपण बऱ्याच दिवसांपासून समलोचन ऐकत आलो आहोत. त्यामध्ये माजी भारतीय फलंदाज आकाश चोप्रा यांचे देखील नाव आहे. या माजी क्रिकेटपटूच्या समलोचनाचे लोक खूप कौतुक करतात. परंतु काही वेळा ते टीकेलाही बळी पडतात.
यामध्ये आयपीएलमध्ये सोमवारी (19 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे ते वादात सापडले असून लोकांनी त्यांच्यावरती टीका देखील केली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नई संघाने 45 धावांनी शानदार विजय नोंदविला. यामध्ये चेन्नईने राजस्थानला 189 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु सीएसकेतील मोईन अलीच्या (7 धावांत 3 बाद) या कामगिरीमुळे राजस्थानला केवळ 143 धावा करता आल्या आणि 45 धावांनी त्यांचा पराभव झाला.
या सामन्यादरम्यान अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा फलंदाजी करीता मैदानात आला होता. परंतु 18 धावा करून तो बाद झाला. धोनीला युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने झेलबाद केले. चेन्नईच्या खेळीनंतर एका लाईव्ह टीव्ही कार्यक्रमात आकाश चोप्रांना धोनीच्या खेळीबद्दल विचारले गेले. यावर ते म्हणाले की, “लोक ज्याला देव मानतात त्याच्यामधील कमतरता बघतच नाहीत. हे थोडेसे कडू आहे पण तेच सत्य आहे. जेव्हा जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा सावली थोडी लांब होत जाते.”
39 वर्षीय महेंद्रसिंग धोनी मोठी खेळी खेळू शकला नसला, तरी चाहत्यांच्या मनातील त्याच्याविषयीचे प्रेम अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे चाहत्यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या प्रत्येक सामन्यात त्याच्यावर लक्ष ठेवले आहे. परंतु यावेळी जेव्हा आकाश चोप्रा यांनी त्याच्या अपयशी खेळीवर टीका केली, तेव्हा त्यांना ट्रोल करण्यात चाहत्यांनी कोणतीच कसर सोडली नाही.
https://twitter.com/itsvibhore2703/status/1384174867600220164?s=20
@ipl @cricketaakash when Aakash Chopra is making a strong comment on Mahi he should have a self realisation that Msd has played more matches than his total international runs
— Dr Sudesh Singh (@DrSudeshSingh1) April 19, 2021
Ye aakash Chopra irfan pathan all were criticising Dhoni chopra ko bolo usko test match khelna sikhe zyada bola na kare
— Cricket ALLROUNDER (@tweetCsk) April 19, 2021
This Akash Chopra has never played a good cricket in his life and has bad habit and bad mouth always against Chennai super kings
— Sandeep Patel (@Sandeep91779618) April 19, 2021
राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना महेंद्रसिंग धोनीने आणखी एक विक्रम केला. संघाचा कर्णधार म्हणून 200 सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला. या मोसमात धोनीने आतापर्यंत 18 धावा केल्या असून या सर्व धावा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आलेल्या आहेत.
गेल्या वर्षीही युएईमध्येही धोनीची बॅट शांत होती. मागच्या सत्रात त्याने 14 सामन्यांत 200 धावा केल्या होत्या. परंतु त्यामध्ये एकही अर्धशतक नव्हते. तसेच गेल्यावर्षी त्याच्या संघाचीही कामगिरी खूपच खराब होती. परंतु यावेळी पहिला सामना गमावल्यानंतर त्याच्या संघाने सलग दोन सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे चाहत्यांनाही पुढच्या सामन्यातही माहीची बॅट काहितरी कमाल करेल, अशी आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नाणं उचला अन् खिशात टाका, गल्ली क्रिकेटची सवय का अजून काही; बघा संजू सॅमसनने काय सांगितलं?
Video: एकचं नंबर! लाईव्ह सामन्यात धोनीचा जड्डूला गुरुमंत्र अन् दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बोल्ड
चेन्नई टू मुंबई, आरसीबीचा कर्णधार कोहली पत्नी अन् लेकीसह मुंबईत दाखल; विमानतळावरील Video व्हायरल