मॅनचेस्टर | मंगळवार, तीन जुलैला भारताच्या इंग्लंडवरील विजयात शतकी खेळी करून विजयाचा शिल्पकार ठरलेला केएल राहुल मैदानावरील खेळाबरोबर त्याच्या सेलिब्रेशनसाठीही प्रसिद्ध आहे.
या सामन्यात राहुलने शतक केल्यानंतर विराट कोहली बरोबर पोर्तूगालचा स्टार फुटबॉललपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो स्टाईलने सेलिब्रेशन केले.
या सिलिब्रेशनचा धागा पकडत केएल राहुलचा संघसहकारी दिनेश कार्तिकने सामना संपल्यानंतर त्याची मुलाखत घेतली.
या मुलाखतीमध्ये राहुलने सेलिब्रेशनचे रोनाल्डो कनेक्शन उघड केले.
“हो, ही सेलिब्रेशन स्टाईल ख्रिस्तियानो रोनाल्डोची आहे. मला ती आवडते. तुला तर माहीतच आहे मी आणि विराट रोनाल्डोचे किती मोठे चाहते आहोत .” दिनेश कार्तिकला मुलाखत देताना राहुल म्हणाला.
DON'T MISS: From his match-winning century, him going through tough times to coming up with new celebration styles, @klrahul11 speaks to @DineshKarthik post #TeamIndia's comprehensive 1st T20I win against England – by @RajalArora
Full Video Link—-> https://t.co/991dWFlVZp pic.twitter.com/uUl6mK9jl0— BCCI (@BCCI) July 4, 2018
मंगळवार, ३ जुलैला झालेल्या सामन्यात भारतीय संघाने आठ गडी राखून इंग्लंवर विजय मिळवला या विजयात केएल राहुलचे नाबाद शतक आणि कुलदीप यादवच्या पाच बळींनी मोलाची भूमिका बजावली.
-आणि काल कसोटीत ४४ वर्षातील सर्वात निचांकी धावसंख्येची झाली…
-फिफा विश्वचषकातील अचूक निकाल सांगणाऱ्या ऑक्टोपसचे केले तुकडे